वंचितचे उमेदवार आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत पोहोचणे आवश्यक! — भांडवलदारी पक्षांना आपलं म्हणून अन्यायग्रस्त ठरोलय,तरीही त्याच पक्षांना निवडणुकीत पाठबळ देणे हे गुलाम मानसिकतेचेच लक्षण नव्हे काय?

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

        सामाजिक व राजकीय दायित्वातंर्गत मताधिकारांचा अधिकार बजावताना,”महाराष्ट्र राज्यातील,नागरिकांचे संरक्षण व त्यांचे अधिकार डोळ्यासमोर असायला हवे.

            देशातील व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी,”आरक्षण म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय प्रतिनिधित्वांसह उन्नती व प्रगतीचे महत्त्वपूर्ण कायदेशीर माध्यम आहे,मार्ग आहे.

       हेच माध्यम परिवर्तन घडवून आणित आहे आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील समिकरणे आपल्या बाजूने करीत आहे.

         यामुळेचे भारत देशातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी व इतर समाजातील नागरिक आता आरक्षणाचे महत्व काय आहे हे समजू लागले व आरक्षणासाठी संघर्ष करायला लागले आहेत.

         महाराष्ट्र राज्यात मराठा-कुणबी,धनगर,माना,गोवारी,ओबीसी यांचा आरक्षणासाठीचा संघर्ष सर्वश्रुत सर्वांनी अनुभवला आहे.

         मात्र,बहुसंख्य समाजाचे म्हणजे ओबीसी,एससी,एसटी अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी व इतर वंचित बहुजन समाजाचे सत्ता नेतृत्व योग्य विचारातंर्गत स्वबळावरचे नसल्याने आणि भांडवलधारी व ब्राह्मणधारी विचारांचे असल्याने त्यांना हे पक्ष केवळ गोलगोल घुमविण्याचे सातत्याने काम करतात आणि सोयीनुसार त्या त्या समाजाचा राजकीय फायदा घेतात हे सत्य आहे.

          तरीही बहुसंख्य समाजाचे नागरिक,मतदार,हे गोलगोल घुमविणाऱ्या व सातत्याने उपयोग घेणाऱ्या पक्षालाच आपले मानतात हिच त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे.

       याच त्यांच्या कमजोरीने बहुजन समाजातील नेते,पदाधिकारी,कार्यकर्तागण, कमजोर व परावलंबी झाले आहेत.म्हणूनच त्याचे आरक्षण व अधिकार धोक्यात आले आहेत हे वास्तव आहे.

            महाराष्ट्र राज्यात आरक्षणावर निर्भिड बोलणारे आणि आरक्षण कसे वाचवले जाईल,कसे दिले जाईल, याबाबत स्पष्ट खुलासे करणारे पक्ष नेतृत्व फक्त एकमेव म्हणजे अँड.प्रकाश आंबेडकर होय.

            वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर हे आरक्षण विरोधकांवर व आरक्षण बंद करु इच्छिणाऱ्यांवर अक्षरशः कायदेशीर तत्वानुसार तुटून पडतात आणि सर्वांचे आरक्षण वाचविण्यासाठी धडपडताना दिसतात.

       बहुजन समाजातील नागरिकांच्या हितासाठी व संरक्षणासाठी कसलेले व विचारवंत नेतृत्व अँड.प्रकाश आंबेडकरांसारखे असताना दुसरीकडे जाण्याची गरज नाही.

       मात्र,महाराष्ट्र राज्यात,”जात व धर्म विचारांचा प्रभाव,सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्चस्ववादी ठरत असल्याने बहुजन समाजातील मतदार हे स्वतःचे स्वतःच खूप मोठे नुकसान नेहमी करीत आहेत,या वास्तवाला आतातरी अभ्यासू व समजदार नागरिकांनी,सर्व पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी वेळेत समजून घ्यावे.

       अन्यथा नकळत तुमचे शोषक तुम्हीच ठरणार आहात व तुमचे हक्क आणि अधिकार नाकारणारे तुम्हीच ठरणार आहात हे वास्तव नाकारता येणार नाही.

        स्वतःला ज्ञानी व समजदार समजणारे नेते हे स्वतःच राजकीय क्षेत्रातंर्गत पळपुटे ठरतात व स्वतःचे आणि स्वतःच्या समाजाचे हित सोडून दुसऱ्यांच्या हितासाठी कमजोर ठरतात त्यांना केवळ वैचारिक व मानसिक गुलामच म्हणतात…

        त्यांना तत्वज्ञानी म्हणता येणार नाही आणि स्वतःच्या समाजाचे रक्षकही समजता येणार नाही.

        सामाजिक शक्ती अंतर्गत राजकीय शक्ती बळकट करणे साधी आणि सरळ बाब असेल.पण सदर व्यक्ती अन्वये ती शक्ती समाजाच्या हितासाठी,लाभासाठी,संरक्षणासाठी,हक्कासाठी लाभकारक ठरली नसेल तर त्या राजकीय व सामाजिक शक्तीचा उपयोग काय?हा प्रश्न वारंवार उपस्थित होणारच!…

       म्हणूनच राजकीय शक्तीचा योग्य सदोपयोग स्वतःच्या व समाजाच्या हितासाठी करायचा असेल तर महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी,”वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना,महाराष्ट्र राज्यातील विधानसभेत पाठवायलाच पाहिजे या मताचा मी तरी आहे…