महाराष्ट्रीयन मतदारांनो 20 नोव्हेंबरला मतदान करताना, हे लक्षात ठेवा.. — भाग १२…..

     लोकशाही केवळ निवडणुकीपुरतीच नसते…

      तर ती आमच्या व भावी पिढीच्या कायम उन्नतीची प्रक्रिया असते…..

     मानवतेच्या कृत्रिम शत्रूला गाडण्याची शेवटची संधी….

     महाराष्ट्राने आजवर देशाचा सांस्कृतिक आणि पुरोगामीत्वाचा गाडा एकट्याने चालवीला,तो क्रांतिकारकांच्या क्रांतीवर…

      पण आज तोच आमचा महाराष्ट्र येथील राजकारण्यांनी ( सर्वच राजकीय पक्षातील राजकीय नेत्यांनी,विशेष करुन सत्ताधाऱ्यांनी ).

        तुम्ही सकाळी सकाळीच तीन दिवसाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्या काळ्या टोपिवाल्याकडून चोरून शपथविधी घेण्याचे कारण ते कोणते होते?

    तुम्ही ( भाजपवाले ) 105 + 45 (घरफोडी करुन ) स्पष्ट बहुमतात असतांना सुद्धा ……

    पुन्हा दुसऱ्या घरफोडीची गरज काय होती?

     हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्रीयन जनतेतर्फे आहे.

या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नाही.

     नैतिकता असेल तर देणार ना…..!

       यांना,या संविधान विरोधी शक्तीला,ज्यांनी संविधान खोका शिल्लक ठेऊन मोडतोड केली. त्या संविधान विरोधी आणि त्यांना साथ देणाऱ्या सत्ताधारी शक्तीला अडीच वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना जाब विचारा.

      देशात महाराष्ट्र गेल्या अडीच वर्षात कर्जबाजारी रँकमध्ये 14 वरून क्रमांक 3 वर आणून ठेवला आहे!

       छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो काय…

अक्षय शिंदेचा एंकौंटर होतो काय……

      काय ते हॉटेल,काय ते झाडी, काय ते डोंगर म्हणून आम्हाला हिणवता काय…..

       मिंधे गटाच्या मागून येऊन सत्तेत पहिला नंबर लावता काय……

      यामुळेच पुरोगामी महाराष्ट्राचा बिहार गेल्या अडीच वर्षात कधी झाला,हे कळलेच नाही…..!

      तेंव्हा या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी ही प्रत्येक मतदाराची आहे….

      या सर्वांचा विचार करूनच मतदान करावे.कारण,केवळ मानवतावादाच्या कृत्रिम शत्रूला कायमचे गाडण्यासाठी!

कारण…..

तुमच्याच हातात सर्वकाही आहे…

      कारण तुमच्या हातातील या मताच्या अधिकारात एवढी शक्ती आहे,की या नितिभ्रष्ट व्यवस्थेचा कडेलोट होऊन जाईल….

         जर कदाचित कडेलोट झालाच तरी आपण सर्वजण मिळून या EVM ला कायमचे गाडून टाकून आपल्या मताचा अधिकार सुरक्षित ठेऊ…..

        कारण हे संविधान आम्ही भारताचे लोक यांच्यासाठी आहे. आणि स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगिकृत करण्यासाठी आहे….

असा निर्धार करुनच मतदान करा..

********

विनंती :- प्रत्येकांनी आजपासून 20 नोव्हेंबर पर्यंत मतदान जागृतीसाठी दररोज येणाऱ्या सर्व पोस्ट आपल्या मोबाईल मधील जेवढे व्हाट्सप गृपआणि मो. नं. असतील त्यावर अपलोड करुन व्हायरल कराव्यात.

******

आवाहनकर्ता आणि जागृतीचा लेखक..

        अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689…