इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने ॲड.नाझीम शेख यांना भुमीपुत्र पुरस्कार जाहीर…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : येथील प्रसिद्ध विधीतज्ञ तसेच आळंदी शहराचे अभ्यासक, इतिहासतज्ञ ॲड.नाझीम शेख यांना इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने भुमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी सांगितले.

             इंद्रायणी साहित्य परिषदेच्यावतीने दुसरे इंद्रायणी साहित्य संमेलन मोशी येथील जय गणेश सभागृहात शनिवार, दिनांक १८ व रविवार, दिनांक १९ रोजी संपन्न होणार असून यामध्ये इंद्रायणीच्या परीसरातील काही विशेष व्यक्तींचा भुमिपुत्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून यामध्ये आळंदी येथील इतिहासतज्ञ ॲड.नाझीम शेख यांचा सुध्दा गौरव करणार आहे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असून यावेळी ज्येष्ठ विचारवंत संजय आवटे, शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार, संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, संस्थेचे अध्यक्ष लेखक संदीप तापकीर उपस्थित राहणार आहेत.

            ॲड.नाझीम शेख हे आळंदी शहरातील पुरातन,पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर अभ्यास करत असून त्यांनी आळंदी आणि परीसरातील नामशेष झालेल्या जलकुंडाचा अभ्यास करत शोध घेतला आहे. तसेच त्यांनी विविध सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेख व माहितीद्वारे नाट्य लिखाण केले आहे. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना भुमिपुत्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे संदीप तापकीर यांनी सांगितले.