धुमाकूळ घालणाऱ्या वन्यप्राणी माकडांचा रेस्क्यू….

    चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी भंडारा 

लाखनी:-

             काळ आणि वेळेनुसार वन्यप्राण्यांचे गावाकडे प्रस्थान होत आहे.वन्यप्राणी कोणतेही असले तरी त्या वन्यप्राण्यांची भिती मोठ्या मनुष्यासमात्रांना व लहान मुलांना असते.असीच एक घटना लाखनी वनबिट अंतर्गत मौजा सालेभाटा या गावात घडली.वन्यप्राणी माकड हे मौजा सालेभाटा येथे मागील ३ दिवसापासून धुमाकूळ घालत होते.याबाबतची गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली व रेस्क्यू अन्वये माकडांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.

          बीट लाखनी अंतर्गत मौजा सालेभाटा येथे तीन दिवसापासून धुमाकूळ घातलेल्या वन्य प्राणी माकडाला आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ रोजी श्री.एस.पी.गोखले वनपरिक्षेत्र अधिकारी लाखनी व श्री.जे.एम.बघेले क्षेत्र सहाय्यक लाखनी यांच्या मार्गदर्शनात कु.टी.जी. गायधने,कु. एम.एल. शहारे, कु.ए.ए.रंगारी, श्री.डी.एस.बोरकर, श्री.एस.एम.राणे व इतर वन कर्मचारी व सर्प मित्र मयूर गायधने यांनी मौजा सालेभाटा येथे जाऊन धुमाकूळ घातलेल्या वन्यप्राणी माकडाला गावकऱ्यांच्या सहकार्याने रेस्क्यू करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले…