रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर :-
चिमूर तालुक्यातील तडोधी (बा) वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या नेरी उपक्षेत्रातील मौजा वडसी येथे १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पट्टेदार वाघाने गावा जवळील गोठ्यात शिरुन बैलांला ठार केले व पाचशे मीटर अंतरावर ओढत नेले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
याचबरोबर गोठ्यातील गायीवर हमला करुन जखमी केले आहे.या घटनेने मौजा वडसी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाळी उत्सवातंर्गत गायगोधनाच्या दिवसीच वडसी येथील सोमा जाभुळे यांच्या मालकीच्या गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केले व काही अंतरावर ओढत नेले,गायीला जखमी केले.या दुर्दैवी घटनांन्वये नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडसी,गोदेंडा,खातोडा परीसरात पट्टेदार वाघ आणि वाघीणीचा वावर आहे.या परिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना नेहमी होत असते.मागील महिन्यात वाघीण आणि तिनं पिल्याचे दर्शन गावातील लोकांना झाले होते.
तपोभूमी येथील वन उद्यानात वाघीण पिल्ल्यासहीत नागरीकांना दर्शन देत होती.परतु या पिल्ल्यासह वाघिणीच्या दर्शनाकडे वन विभागाने दुर्लक्ष केले होते.यामुळे परीसरातील गावकऱ्यात वनविभागप्रती सध्यातरी असंतोष निर्माण झाला आहे.
सदर घटना ही गावाला लागून असलेल्या गुरांच्या गोठ्यावर हल्ला करण्याची असल्याने मौजा वडसी येथील नागरिकांत भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर वाघ हल्ला घटनेची माहिती सकाळी होताच तात्काळ ती माहिती वनविभागाच्या क्षेत्रसहायक याना देण्यात आली.
मात्र,परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी क्षेत्रातील नागरिक करीत आहेत.वनविभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी काय पाऊल उचलणार हे अजूनतरी गुलदस्त्यात आहे.