प्रितम जनबंधु
संपादक
आरमोरी :- नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य,महिला सशक्तीकरण व अन्य क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या युवारंग तर्फे आज दि.१४ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ५:३० वाजता बाजारपेठ येथे समाजसेविका अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी युवारंग चे संगठक रणजीतजी बनकर यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी जीवनयात्रेची संपूर्ण माहिती उपस्थित महिलांना दिली.
याप्रसंगी आशुतोष गिरडकर,विभाताई बोबाटे, आशाताई बोळणे, महानंदा ताई शेंडे, उमाताई कोडापे, ज्योतीताई बगमारे व वार्डातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.