नरचुली पिपरटोला परीसरात रानटी हत्तीचा धुमाकुळ… — परीसरातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…. — वनविभागाने रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी….

प्रितम जनबंधु

    संपादक 

          आरमोरी तालुक्यातील अगदीच शेवटच्या टोकावर असलेल्या नरचुली पिपरटोला येथील शेतशिवारात हत्तीचा कळप गेल्या एक महिन्यापासून दाखल झाला असुन शेतशीवारात धुमाकुळ घालत आहे शेतशिवारातील धानाची मोठ्या प्रमाणात नासधुस करीत आहेत. हाती आलेले पीकाचे मोठ्या नुकसान झाले असल्याने परीसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे. परीसरातील शेतकऱ्याचे उपजीविकेचे एकमेव साधन शेती असल्याने आता उपजीविका करायची कशी असा यक्षप्रश्न परीसरातील नुकसानग्रस्त नागरिकाच्या मनाचे ठाव घेत आहे.

                गेल्या महीन्याभरापासुन सदर रानटी हत्तीचा कळप सभोवतालच्या शेतशीवारात वावरत असल्याने नरचुली पिपरटोला येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे चित्रविचीत्र परिस्थिती बघायला मिळत आहे. वनविभाग पाडत ठेवुन असला तरी रानटी हत्तीवर नियंत्रण करणे अवघड झाले आहे. रानटी हत्ती दिवसा जंगल परीसरात राहत असुन रात्रीच्या सुमारास शेतशिवारात आपला मुक्काम ठोकत असतात. त्यामुळेच शेतकरी पुर्णतः हतबल झाला आहे. हातात आलेले पीक नष्ट होताना बघताना शेतकर्‍यांची अगदीच दैना अवस्था झाली असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बघायला मीडत आहे.

                 रांगी, नरचुली, वनखेडा, वानरचुवा, पीपरटोला, शेतशीवार तसेच जंगल परीसरात रानटी हत्ती कळपाने वहिवाट करीत नरचुली पीपरटोला शेतशिवारात हत्तीचा कळप महिन्यापासून दररोज सायंकाळच्या सुमारास शेतीत दाखल होत असतात पीपरटोला, गावापासून सरासरी ५०० मीटर अंतरावर सदर हत्तीचा कळप असल्याचे समजते. यामधे अंदाजे १७ ते १८ हत्ती समुहाने असल्याचे नासधुस करण्यात आलेल्या परीसरातुन स्पष्ट होत आहे.

       गावातील नागरीकाना कसल्याही प्रकारची हानी होऊ नये, हत्तीचा कळप गावात येऊ नये याकरिता वनवीभाग सतर्क झाले असुन गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तीच्या कळपावर पाडत ठेऊन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सदर रानटी हत्तीच्या कळपाने धानाचे पुंजने अस्ताव्यस्त केले असुन उभे पीक पायदळी तुडवत सबब शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. शेतिउपयोगी साहीत्याचीही तोडफोड, फेकाफेक, करण्यात आली असल्याने शेतकरीवर्ग प्रचंड नुकसानग्रस्त दिसुन येत आहे.

                 रानटी हत्तीचा कळप रात्रीच्यावेडी शेतशिवारात वावरत असुन पीकाची नासधुस करीत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. पीपरटोला नरचुली येथील रहिवासी हत्तीचा कळप दाखल झाल्याने भयभीत झाले असुन रानटी हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी शेतकर्‍यांची प्रमुख मागणी जोर धरु लागली आहे.