मारोती कांबळे/प्रतिनिधी
एटापल्ली:दि ०८/११/२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत नदिपलीकडील कुदरी गावात लसिकरणा करिता आरोग्य चमु गेले असता सरिता विनोद नरोटे २३ वर्षे ह्या गरोदर मातेला प्रसुती तारखेच्या आधिच प्रसुती कळा सुरु असल्याचे कळाले.
सरिता ही पहिल्या खेपेची गरोदर माता असल्याने तीला प्रसुती करिता त्रास होईल या अपेक्षेने आरोग्य सेविका दुर्वा यांनी दवाखाण्यात भरती होण्यास सांगितले.परंतु चक्क मातेनेच दवाखान्यात येण्यास नकार दर्शविला.
ईथेच जीव गेला तरी चालेल पण घरीच बाळंतपण करेल असे पालकांसमोर आरोग्य चमुला सांगितले. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती होते की ही माता जोखमीच्या स्थितीत जावु शकते.त्यांनी खुप विनवण्या करुन सुद्धा माता दवाखाण्यात येण्यास तयार नव्हती,तेव्हा आरोग्य चमु हे उपकेंद्र मवेली येथे परत येवुन बाळंतपण किट व ईमरजन्सी औषधी नेण्याकरिता आले. त्याचवेळी त्यांनी तोडसाचे मानसेवी वैद्यकिय अधिकारी तथा प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॅा राकेश नागोसे यांना दुरध्वनी द्वारे सदर माहिती दिली.
तेव्हा डॅा नागोसे यांनी जरा ही वेळ न घालविता कुदरी गावाजवळ नदिच्या काठावर येवुन पोहचले, नदिमध्ये पाणी असल्याने ॲंबुलंस पलिकडे जाउ शकत नाही म्हणुन सर्वांनी पायी प्रवास करुन कुदरी गाव गाठले.
गावात पोहचतात गरोदर मातेला त्यांचे पालक व गावकरी खाटेवर दवाखन्यात घेवुन येत असल्याचे दिसले.
गावात ट्रॅक्टर ड्रॅायवर नसल्याने मातेला खाटेवर न्यावे लागले. त्यावेळी डॅा नागोसे यांनी जंगलाच्या वाटेतच गरोदर मातेची आरोग्य तपासनी केली,तेव्हा मातेला रक्तस्त्राव होत असल्याचे समजले.
गुंतागु्त वाढु नये या उद्देशाने गरोदर मातेला खाटेवर त्याच स्थितीमधे गावकऱ्याच्या सहकार्याने नदिच्या काठावर पोहचविले. नंतर ॲंबुलंसने ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पोहचविले.
बाळंतपणाला वेळ आहे व रक्तस्त्राव होत असल्याने एटापल्ली येथिल डॅाक्टरांनी अहेरी येथे रेफर केले.अहेरी उपजिल्हा रुग्णालय येथे मध्यरात्री १:३० वाजता प्रसुति तज्ञाद्वारे सरिता ची नॅार्मल प्रसुति करण्यात आली व २ किलो ३०० ग्राम नवजात बालिकेला जन्म दिला. मातेची व बालकाची स्थिती चांगली असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले.
आदिवासी बहुल भागात घरी प्रसुतीचे प्रमाण अधिक आहे. पुजारींवर तसेच पारंपारीक पद्धतींवर विश्वास असल्याने येथिल नागरीक घरीच प्रसुति करण्यास प्रथम प्राधान्य देतात, संस्थेत प्रसुति करणे हे आरोग्य कर्मचार्यांकरीता निश्चितच आव्हान ठरते.तरीही विवीध समुपदेशन व मार्गदर्शनाणे आरोग्य कर्मचारी गरोदर मातांना संस्थेत आणण्याचा प्रयत्न करतात.
सरिता ही पहिल्या खेपेची माता असल्याने व प्रसुति दरम्यान गुंतागुंत वाढत असल्याने मातेच्या व बालकाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्याता होती त्यामुळे सरिताला दवाखाण्यात दाखल करणे अत्यंत गरजेचे होते.
या कार्यांचे श्रेय उपकेंद्र येथिल सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक या सर्वांचे आहे.