निरा नरसिंहपुर दिनांक :15
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सालाबाद प्रमाणे ग्रंथाचे वाचन चालू आसलेला संपूर्ण भावार्थ रामायणाची सांगता समाप्तीसाठी जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे 10 वे वंशज गुरुवर्य श्री. बापूसाहेब मधुसूदन मोरे (महाराज) यांच्या उपस्थितीत शनिवार, दिनांक 19 /11/ 20 22 रोजी होणार आसल्याचे पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्त बाळासाहेब घाडगे महाराज बोलत होते. चालू वर्षी 2022 सालामध्ये संपूर्ण भावार्थ रामायण सोहळा गेली चार महिने दिनांक 30/ 11 /20 22 ते 19/ 11/ 20 22 पर्यंत ,, संपूर्ण रामायण ग्रंथाचे वाचन पार पाडून समाप्ती सोहळा होणार आहे. या समाप्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी मंदिरातील हानुमान मुर्तीस अभिषेक करून होणार आहे. अखिल भारतीय वारकऱ्यांचे हृदय स्थान व तुकाराम महाराजांचे वंशज गुरुवर्य श्री बापूसाहेब महाराज देहुकर मळवली यांच्या मार्गदर्शना खाली व डॉक्टर लक्ष्मण आसबे महाराज यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावातुन रामफेरी व ग्राम प्रदक्षिणा घेण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वाजता ग्रंथाचे वाचन करून शेवटी भाविक भक्तांनसाठी महाप्रसाद घेऊन ग्रंथाची सांगता होईल. समाप्ती सोहळ्यासाठी अन्नदाते म्हणून,, भगवान पंढरीनाथ काटकर,, तसेच ग्रामपंचायत सदस्य विद्यादेवी आबासाहेब बोडके, यांच्या वतीने संपूर्ण महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे आयोजक व नियोजन विद्यमान सरपंच ज्योती श्रीकांत बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके माजी सरपंच आबासाहेब बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, आशोकआबा बोडके, संचालक संजय बोडके, वाचक भाविक भक्त संदिपान पडळकर, महादेव सुतार, बाळासाहेब घाडगे, महेश सुतार, सहित सर्व वाचक सु़चक व भक्त आणि समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक मोठ्या संख्येने या भावार्थ रामायण ग्रंथाच्या समाप्ती सोहळ्यासाठी उपस्थितीत राहणार आसल्याचे यावेळी सांगण्यात आले.