पारशिवनी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. 

    यानिमित्ताने घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. 

      मुलांचे आवडते चाचा नेहरू यांच्या जीवन चरित्रावर मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी प्रकाश टाकला.बालक दिनाच्या निमित्ताने लोकल टू ग्लोबल महाराष्ट्र राज्य सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत अनन्या कोहळे, मानव बावणे यांनी प्रथम,नैतिक धोटे याने द्वितीय तर श्रेयस वाटकर, सृष्टी धोटे, नयन निंबुळकर, वंश डाफ यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. 

      सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच याप्रसंगी शाळेतील परिसरात गुलाबाची रोपटे लावण्यात आली. 

       तद्वतच बाबुळवाडा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु जयंती,बालक दिन कार्यक्रम संपन्न झाला!या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत बांगळकर यांनी पुष्पमाला अपर्ण करून शाळेतील मुलाना व गावातील उपस्थित नागरिकांना पं.जवाहरलाल नेहरू यांचे जिवनातील प्रेरणादायक प्रसंगाची माहीती दिली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News