सिहोरा, वाघधरे वाडी मध्ये धुमाकुळ घालणाऱ्या वाघाचा मुत्यु…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी 

कन्हान : – नगरपरिषद अंतर्गत कन्हान नदी काठा लगत सिहोरा गावातील तीन गाई ठार करून तीन गौवंशाला जख्मी करून धुमाकुळ घालणारा वाघ वाघधरे वाडी परिसरातील नागपुर बॉयपास राष्ट्रीय चारपदरी महामार्गा पासुन ८० मिटर अंतरावर तारसा रोड वरील हटवार यांच्या घरामागे रेल्वे लाईनकडे असलेल्या धान, कापुस व तुरीच्या शेतात आज मंगळवार (दि.१५ ) ऑक्टोंबरला दुपारच्या दरम्यान मृत अवस्थेत आढळल्याची माहीती वन विभागास मिळाल्याने वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.

        शेत मालक निलेश राधेश्याम हटवार खंडाळा याने शेतात किटनाशक फवारणी केली होती. त्या शेतात वाघ लपुन बसुन असल्याने त्या वाघाला फवारणीच्या औषधीची बाधा होऊन त्या वाघाचा मूत्यु झाला असेल अशी प्राथमिक चर्चा होत आहे.