दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची प्रशालेत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर व शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज व डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतात मोबाईल मधून आपण जे वाचन करतो त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम सांगत जास्तीत जास्त वाचन हे पुस्तकांमधून व वर्तमानपत्रातून करण्याचे आवाहन केले.
संत साहित्यांचे व ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते, आपले आरोग्य चांगले राहते, मन प्रसन्न राहते, आपण जीवनात यशस्वी होतो, बालमनावरती योग्य संस्कार होण्यासाठी प्रशालेमध्ये ओळख ज्ञानेश्वरी सारखे संस्कारक्षम उपक्रमही राबवले जातात. विद्यार्थ्यांना दररोज वर्तमानपत्रातून एक तरी बातमी वाचण्याचा संकल्प करण्यास सांगितले.
विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन करण्याचा आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निशा कांबळे, वैशाली शेळके, राहुल चव्हाण, उमेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा भालेराव यांनी केले.