
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला.यामुळे निवडणूक केव्हा होणार याबाबतची प्रतिक्षा संपली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा निर्वाचन क्षेत्रात एकाच वेळी मतदान होणार असून २९ आक्टोंबरला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे तर २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र राज्यांतर्गत १ लाख १८६ मतदान केंद्रे असून राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे.
*****
महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा निर्वाचन क्षेत्र खालील प्रमाणे…
विदर्भ – ६२..
मराठवाडा -४६..
मुंबई – ३६…
कोकण – ठाणे – ३९…
खान्देश – ४७
पश्चिम महाराष्ट्र – ५८