कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी:-पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य,द्वारा भंडारा जिल्हा अध्यक्ष म्हणून पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा काकेपार येथील पोलीस पाटील श्री.विनोद गुंडेरावजी मालोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रमिक संघ अधिनियम 1926 अन्वये नोंदणीकृत (नोंदणी क्र.5681) पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री.दिपक बाबू पालीवाल यांनी त्यांची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
भावरावजी मेंढे- अध्यक्ष पवनी तालुका पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य, होमराज चचाने- सचिव पवनी तालुका पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य,राजेश्वर धावडे,प्रफुल सावरबांधे पोलीस पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विनोद मालोदे यांची भंडारा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली.
जिल्हा अध्यक्ष नियुक्ती बद्दल विनोद मालोदे यांचे,सर्वश्री संजय कटकमवार,बेनिरामजी राऊत,राजू जोगी,सोपान शेंडे,मनोज मेहुने,योगेश लांजेवार,रामराव उके,मारोती ठाकरे यांनी अभिनंदन केले.