बाळासाहेब सुतार
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी
नरसिंहपुर ते बावडा परिसरात सर्जा राजाचा बैलपोळा साजरा करण्यात आला. भाद्रपदी आमावस्या याच दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बैल पोळा हा मोठा उत्साहात सण साजरा करण्यात येतो परंतु निसर्गाच्या मेघराजाने पाठ फिरवील्यामुळे सर्जा राजाचा बैलपोळा हा मंद गतीने साजरा करण्यात आला.
वर्षातून एकदा येणारा हा सण बैलपोळा आसतो बारा महिने शेतामध्ये राब राब कष्ट करून शेतामध्ये शेतकऱ्याला कमवून देणारा हा सर्जा व राजा बैल आसून याच सणानिमित्त एकच दिवशी बैलपोळ्याला शेतकरी सुट्टी घेऊन बैलांना आंघोळ घालून स्वच्छ करतात व रंगीबेरंगी रंगाने व बेगिड लावून बैल गाय म्हैस शेळ्या मेंढ्या या सर्व मुख्य जनावरांना सजवत आसतात.
गावातील सर्व ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वाजत गाजत फटाक्याच्या आवाजात गाव फेरीचा आनंद घेत आसणारा शेतकरी राजा आहे. गावातुन ग्राम फेरी झाल्यानंतर त्याच बैल जोडीला पुरण व पोळीचा नैवेद्य देऊन मनोभावाने पूजा केली जाते.