
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
पार्श्वगायक,अभिनेता, संगितकार,निर्माता,दिग्दर्शक, आणि पटकथालेखक म्हणुन भारतीय चित्रपट सृष्टीवर ,चारदशके अधिराज्य गाजविणारे स्व.किशोरकुमार यांची ३७ वी पुण्यतिथी दर्यापुर येथील प्रबोधन विद्यालयात साजरी करण्यात आली.
त्या निमित्याने कार्यक्रमाचे उद्घाटन प्रबोधन विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय रेवस्कर व कार्यकारणी सदस्य किशोर गणोरकर,गजानन कोरडे,राजेश श्रीराव,डॉ.बोंडे,डॉ.साबळे,गजानन सरदार,डी.आर.जामनिक,धनपाल गजभिये,श्याम देशपांडे,किशोर नगरकर,प्रा.गजानन हिरोळे,गजानन देशमुख,महेश बुधे तसेच इतर मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले.
त्यांनी गायलेल्या अजरामर गितांना,”नये दिलो की नई उमंग,या मेलोडी गृपच्या सदस्यांनी,स्व किशोर कुमार यांना भावपुर्ण श्रध्दांजली व्यक्ती केली.
दर्यापुर शहरा बरोबर ग्रामीण भागातील नवोदित कलाकार,गजानन कोरडे,राजेश श्रीराव,श्याम देशपांडे.डी.आर.जामनिक,डॉ.प्रा गजान हिरोळे,उभयता डॉ मिलिंद साबळे,डॉ.रविंद्र साबळे,शरद सहगल,किशोर नगरकर,आनंद नगरकर,संजय अठवाल,धनपाल गजभिये,किशोर गणोरकर,श्रीकृष्ण सोमवंशी,प्रतिभा पोटे,शर्माका पांडे,अशा अनेक गायक कलाकारांनी सहभाग घेऊन एका पेक्षा एक असे सरस गाणे गाऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहीली.
या तिन तास चाललेल्या कार्यक्रमात राजश्री श्रीराव,हिने उत्कृष्ठ असे नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकली या कार्यक्रमाला बहुसंस्ख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन उत्कृष्ट गायक गजानन सरदार यांनी आपल्या अभ्यासपुर्ण शैलीतुन केली.या कार्यक्रमाला गजानन कोरडे अध्यक्ष,राजेश श्रीराव सचिव,डी.आर.जामनिक उपाध्यक्ष,प्रॉ गजानन हिराळे,श्याम देशपांडे,किशोर नगरकर,डॉ.बोंडे,डॉ.साबळे,शरद सहगल,संजय अठवाल,तसेच नये दिलो कि नया उमंगचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य गण,यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता परिश्रम घेतले.