नवजीवन सीबीएसई मध्ये डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी…

 

      ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

        साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई साकोली येथे डॉ. ए. पी. जे. कलाम यांची जयंती वाचन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य मुज्जमिल सय्यद, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास व प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात पुर्व राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुजा करण्यात आली.

             अध्यक्ष प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी आपल्या मनोगतातून डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते सांगून डॉ. कलाम यांचे परिचय व त्यांनी केलेले संशोधन कार्य तसेच राजकीय क्षेत्रातील कामगीरी याबददल माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सौ. माधुरी हलमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिमा डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतिश गोटेफोडे, जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, श्रीधर खराबे, अशोक मीना, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशात वालदे, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, विशाखा पशिने, वैशाली भगतकर, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, रुनाली पंधरे, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्ण, माधुरी हलमारे, ज्योती डांगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, स्मिता मस्के, माधवी बन्सोड, अनिता धुर्वे, मेघा संग्रामे, प्रगती हुमने, प्रियंका कापगते, शितल कोरे, प्रिती फुलबांधे तसेच इतर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.