
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
नरवाडे ग्लोबल ह्युमन राईट्स असोशिएशन तर्फे आज चिमूरात जिल्हास्तरीय सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेचे अध्यक्षपद नरवाडे ग्लोबल ह्युमन राईट्स असोशिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवाडे हे भुषविणार आहेत.
या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून चिमूरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी किशोर घाडगे हे उपस्थित राहणार आहेत.
याचबरोबर विशेष मार्गदर्शक म्हणून चिमूर तालुका तहसीलदार प्राजक्ता बुरांडे,प.स.चिमूरचे गटविकास अधिकारी राजेश राठोड,चिमूर पोलीस स्टेशनचे प्रमुख ठाणेदार मनोज गभणे,ठाणेदार प्रकाश राऊत,चिमूर सा.ऑडिटर सहारे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन चिमूर येथील(मस्जिद जवळ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले असून आज दुपारी १२ वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.
आज होणाऱ्या नरवाडे ग्लोबल ह्युमन राईट्स असोशिएशनच्या जिल्हास्तरीय सभेला चिमूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सदर असोशिएशनचे तालुका अध्यक्ष किशोर अंबादे,उपाध्यक्ष गोकुल खोब्रागडे,सचिव शिध्दार्थ चहांदे,सहसचिव एकनाथ गोंगले,यांनी केले आहे.