
अनिलकुमार एन. ठवरे
ग्रामीण तालुका प्रतिनिधी
देलनवाडी :- ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक ०७/१०/२०२३ ते १४/१०/२०२३ या कालावधीत धम्म प्रवचन सोहळ्याचे सम्यक बुध्द विहार देलनवडी येथे आयोजन करण्यात आले. या सात दिवसांमध्ये सकाळी बुध्द वंदना व भगवान बुध्द व त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचा वाचन तसेच परत सायंकाळी बुध्द वंदना व परत भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करून त्यावर विस्तृत चर्चा करून प्रबोधन करण्यात आले. या अनुषंगाने मुला – मुलींचे,महिलांचे व युवक वर्गाच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.१४ तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण समाज अध्यक्ष आयु.किशोर भैसारे यांच्या हस्ते करण्यात आले.
तद्नंतर सायंकाळी मुख्य रस्त्याने भव्य प्रमाणात धम्म रॅली काढण्यात आली.त्यानंतर समस्त गावाला भोजनदान करण्यात आले. या सप्ताहात ज्या काही स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्याचे बक्षिस वितरण करण्यात आले या स्पर्धेचे बक्षीस कु. पलछिन अनिलकुमार ठवरे व आयु.श्रीकांत नंदेश्वर यांच्या वतीने देण्यात आले व या भव्य कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
वरील कार्यक्रमास समाज सचिव आयु.लीलाधर टेंभुर्णे,महिला समाज अध्यक्षा आयु.रेखा टेंभुर्णे,सचिव आयु.वैशाली भैसारे,अनिलकुमार ठवरे, डॉ.मुन,डॉ.श्रुती मेश्राम, उराडे मॅडम,चोपडे मॅडम व गावातील प्रतिष्ठित नागरिक,उपासक व उपसिका भव्य प्रमाणात उपस्थित होत्या.