प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी सदस्य आणि सर्पमित्र प्रलय सहारे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन बिन विषारी सापाला एकाच दिवशी आज दि. १५ ऑक्टों. रोजी जीवनदान देऊन वन अधिवासात सोडण्यात आले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मोठा मोहल्ला) येथे राहणारे प्रलय सहारे यांच्या घरी सकाळी ०९ वाजताच्या दरम्यान ०१ फूट लांबीचा बिनविषारी साप दिसला त्याला सर्पमित्र प्रलय सहारे आणि प्रवज्जा प्रलय सहारे यांनी अलगत पकडून डब्यात बंद केले. त्यानंतर सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस असलेल्या दिपक भरणे यांच्या घरी साप निघाल्याची माहिती मिळताच सर्पमित्र प्रलय सहारे, अंकुश सहारे आणि छकुल बोदेले यांनी घर गाठून साडेतीन फुटाचा बिन विषारी तस्कर साप (डोंगरवेल्या) डब्यात पकडले. या सापांना वनविभागास माहिती देऊन जंगल परिसरात सोडण्यात आले.

साप, पशू, पक्षी आणि अन्याजिव निसर्ग समतोल राखण्यास सहकार्य करतात. या जीवांना मारू नका. साप आणि वन्यजीव दिसताच वनविभाग अथवा वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांना माहिती द्या. असे आवाहन यावेळी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com