दखल न्युज भारत
चिखलदरा तालुका
प्रतीनीधी अबोदनगो चव्हाण
मो.न.7588228688
चिखलदरा :- चिखलदरा येथील आय टी आय कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर चिखलदरा येथील एका युवकाने सहा महिन्यांपासून विविध ठिकाणी हॉटेल मध्ये नेऊन अत्याचार केला असून घटनेची वाच्यता करू नये म्हणून जीवे मारण्याची धमकी सुद्दा दिली आहे.
चिखलदरा आय टी आय मध्ये शिकणाऱ्या एका मुलीची ओळख एक वर्षपासून चिखलदरा येथील युवकाशी झाली होती या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले व तेथूनच त्यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या सदर युवकाने जून 2020 मध्ये चिखलदरा येथील त्याचे घर दाखवितो म्हणून बोलावले मी पण तेथे गेलो असता त्याने मला घरी न नेता एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले मी त्याला म्हटले की आपण तुझ्या घरी जाऊ पण मला तुझ्याशी बोलायचे आहे म्हणून एका हॉटेलमध्ये खोलीत नेले खोलीत गेल्यावर तू मला खूप आवडते व मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून शारीरिक संभध ठेवान्यासाठी सांगितले असता मी त्याला नकार दिला तर त्याने मला लग्न करणार म्हणून विश्वास दिला व जबरदस्तीने माझे सोबत संबध प्रस्तापित केले त्यानंतर त्याने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन वारमवार संबंध प्रस्थापित करू लागला परंतु काही दिवसांपासून मला त्या मुलावर संशय आला की तो माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाही व मला टाळत आहे तर मी त्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे भेटण्यासाठी आला असता त्याला माझ्याशी लग्नाबद्दल विचारणा केली असता तुझ्यासोबत लग्न करायचे नाही व मी दुसऱ्या मुली सोबत लग्न केले आहे तुला जे करायचे आहे ते कर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली सदर प्रकरणी चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून घटनेचा संपूर्ण तपास चिखलदरा चे ठाणेदार राहुल वाढवे करीत आहे