संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक दखल न्यूज
सारीपुत्त बुद्ध विहार समिती पी. एस. सी.नगर विर्सी तथा धम्मदीप बुद्ध विहार समिती विर्सी यांच्या संयुक्त विद्यमानाने ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त *”* *एक रात्र निळ्या पाखरांची”* सुमधुर भीम गीताची मेजवानी या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. शितल राऊत सदस्य जि.प.भंडारा,कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे सदस्य पं. स. साकोली ,दीप प्रज्वलन एन.सी. लोधीकर सर, अर्चना ईळपाते पं.स.सदस्य, डॉ. अश्विन भोयर, डॉ. खोब्रागडे मॅडम, भोजेंद्र गहाणे, लीलाधर सोनवाणे ,नंदलाल राऊत, मडावी साहेब, भगवान लांजेवार ,बापू दास पंधरे, अनिल टेंबरे ,निमराज कापगते, गोपीचंद कुंभले, शिवचरण ठाकरे, धनराज कापगते, विनायक बोरकर, व समस्त उपासक ,उपासिका, ग्रामस्थ, युवा मित्र,बाल-गोपाल उपस्थित होते, कार्यक्रमात वक्त्यांनी महामानवांच्या विचारांन वर प्रकाश टाकला तसेच अध्यक्ष भाषणात अनिल किरणापुरे म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना देऊन समाजातील लोकांना युवकांना आवाहन केले की, माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहिलेले काम प्राण पणाला लावून पूर्ण करा. तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घा व दुसऱ्या नाण्याची पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल,पण आज आपली युवा पिढी व्यसनाच्या मागे लागलेली दिसत आहे व मोबाईल मध्ये गुळफल्यामुळे विचारांची देवाणघेवाण थांबली, विज्ञानामुळे जग जवळ आलं पण जिवाभावाची माणसं दुर गेली.आणि अशा परिस्थिती मुलांना घडवताना शाहू,फुले, आंबेडकर विचार देवुन घडवलं पाहिजे जेणेकरून आपले भविष्य, मातारपण चांगले जाईल.समाजाने मला काय दिले यापेक्षा मी समजला काय देऊ शकतो हा विचार जोपर्यंत युवा पिढीच्या मनात येणार नाही तोपर्यंत समाज क्रांती होणार नाही असे ते बोलत होते. सूत्रसंचालन प्रस्ताविक आभार संतोष राउत यांनी केले.