संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
परसोडी येथे ६६वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल किरणापुरे पं.स.सदस्य,प्रमुख पाहुणे दिलीप पर्वते उपसरपंच ,विनोद मदनकर जयश्री पर्वते, रामलाल उके, सुमित उके, कल्पना उके, तकदीर उके ,गौरीशंकर उके, रामकृष्ण मासुलकर ,ललिता रामटेके,कोचे साहेब ,सागर रामटेके, विलास उके, चुनीलाल उके, विठोबा लांडगे, ओमकार उके,आदी उपासक, उपासिका व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाप्रसंगी गावात डॉ. बाबासाहेब व तथागत गौतम बुद्ध यांची रॅली काढण्यात आली नंतर पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले व कार्यक्रमात महामानवांच्या विचार प्रकट करण्यात आले तेव्हा अनिल किरणापुरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणत सांगितले की गौतम बुद्ध यांनी मानव जातींला प्रज्ञा, शिल,करूना, या तत्त्वाची शिकवण दिली बुद्धांचे विचार मुलांना सांगण्यापेक्षा त्यांना दाखवण्याची गरज आहे. विज्ञाण जवळ आला पण हक्काचा माणूस हरवला. मुलांना शिक्षण देताना पैसे कमवणे पुरते शिक्षण देऊ नका तर ते भविष्यात या राज्याचे राज्यकर्ते बनले पाहिजेत, बाबासाहेबांची राहिलेली चळवळ युवकांच्या माध्यमातून सामोर कशी जाईल हे शिकवण्याची गरज आहे. जीवनात आलेल्या संकटावर ,परिस्थितीवर मात कशी करायची हे मुलांना शिकवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचाराची देवाण-घेवाण होणे गरजेचे आहे असे ते बोलत होते.
सूत्रसंचालन श्रीकांत उके, प्रस्ताविक रामलाल उके ,आभार विलास उके यांनी केले.