ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली : सध्या सुरू असलेल्या वार्षिक ३ दशलक्ष टन उत्खननामुळे रस्त्यांची झालेली बकाल अवस्था आणि त्यामुळे वर्षभरात जवळपास ६२ लोकांचा मृत्यू, एक आदिवासी शेतकरी आत्महत्या आणि येलचील येथील आदिवासी महिलेवर ट्रक ड्रायव्हर कडून झालेल्या बलात्काराला जबाबदार असलेल्या सुरजागड लोह खाणीतून आता तीन पटीने उत्खनन करण्यासाठी २७ आक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी आयोजित करण्यात आली असून या जनसुनावणीला जिल्ह्यातील ग्रामसभा, आदिवासी व अन्य स्थानिक जनता, भांडवलशाही विरोधी डावे आंबेडकरवादी आणि पुरोगामी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लेखी विरोध करावा, असे आवाहन डाव्या आघाडीने केला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉ. महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. अमोल मारकवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात संविधानाची पाचवी अनुसूची लागू आहे. पेसा आणि वनाधिकार कायद्यान्वये ग्रामसभांना स्वयंशासनाचे अधिकार तसेच गौण वन उपजाचे मालकी हक्क मिळालेले असतांनाही रोजगाराच्या नावाखाली सुरजागड सह २५ लोह खाणी खोदण्याचे षडयंत्र खासगी कंपन्यांनी रचले आहे. प्रशासकीय बळजबरी आणि दलालांना हाताशी धरून सामान्य जनतेच्या साधनसंपत्तीची खुली लुट सुरजागड खाणीच्या माध्यमातून केली जात आहे.

सुरजागड लोह खाणीला ग्रामसभांचे ठराव, निवेदन, मोर्चे, आंदोलन करुन विरोध करणाऱ्या स्थानिकांना कारवाईचा धाक दाखवून बळजबरीने लोहदगड वाहतुक केली जात आहे. शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी सुरजागड खाण, शेतकरी आत्महत्या आणि रेती तस्करी विरोधात आवाज उठविल्याने त्यांना आणि खदानविरोधी कार्यकर्त्यांना जिल्हा प्रशासनाने अनेक खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे शर्तीचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र जनतेने हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष सुरुच ठेवावा. तसेच सध्या सुरू असलेल्या साधारण दोन हजार वाहनांमुळे अपघातांची मोठी मालिका सुरू झाली आहे. आता तीन पटीने उत्खनन झाले तर गडचिरोलीचे संपूर्ण वैभव आणि नंदनवन बेचिराख होण्याची नामुष्की ओढवली असल्याने येथील जनतेने या खाणीचा जनसुनावणीत सहभागी होवून केला करावा असे आवाहनही डाव्या आघाडीने केला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com