प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टों. १९५६ रोजी नागपूर येथील दिक्षाभूमी जागेवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हा दिवस संपूर्ण जगात धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. याच अनुसंगाने वैरागड येथील बुद्ध विहारात बौद्ध समाज, बौद्ध समाज युवा मंडळ आणि तक्षशिला महिला मंडळ च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

संध्याकाळी बुद्ध विहारा समोरील झेंड्याचे पंचशील ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास संस्था उपाध्यक्ष जनार्दन भानारकर यांच्या अध्यक्षतेखाली. बौद्ध समाज सचिव तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास संस्था सचिव मिलिंद भोयर यांच्या हस्थे करण्यात आले. त्यानंतर पंचशील, त्रिषरण आणि अष्टगाथा घेण्यात आले. कार्यक्रमात भिमागीते, विविध कार्यक्रम आणि जेवण देण्यात आले. 

 

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तक्षशिला महिला मंडळ अध्यक्ष उर्मिला संतोष मेश्राम, सचिव तक्षशिला प्रलय सहारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय विकास संस्था सचिव मनोज खोब्रागडे, सहसचिव जनार्दन बरडे, कोषाध्यक्ष दिलांबर भानारकर, संजय वासनिक, प्रभाकर भानारकर, गोविंदा वालदे, पंकज सहारे, रविकांत भैसरे, सुरेश टेंभुर्णे, माणिक वालदे, मयुरी खोब्रागडे, कल्पना भानारकर, रेशम वालदे, हशिना बोदेले, हेमलता भानारकर, सारिका वासनिक यांनी अथक प्रयत्न केले यावेळी बहुसंख्येने बौद्ध उपासक आणि उपशिका उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com