पारशिवनी : – पोस्टे . च्या हदीतील बखारी येथील शेतमजुर शेती चे काम करून मातीने भरलेले हाथपाय धुत असताना पाय घसरून बखारी डुमरी रोड वरील नहरात पडल्याने शेतमजुर शिवदास भरतलाल पुरेना ( गोसावी)याचा नहरात घटनास्थळीच आकस्मिक मुत्यु झाल्याने त्याच्या परिवारास शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी बखारी चे सरपंच नरेश ढोणे व गावकरी व शेतक-यांनी केली आहे. 

       आज शुक्रवार (दि.१४) ऑक्टोबंर ला बखारी गावात राहणारा शेतमजुर शिवदास भरतलाल पुरेना (गोसावी) वय ४५ वर्ष राह. बखारी हा सकाळी गावातील नामदेव बाझनघाटे यांच्या शेतात महिला शेतमजुरा सह निंदना च्या कामा करिता गेला होता. शेतातील मातीने हाथ पाय भरल्याने दुपारी ३ वाजता बखारी डुमरी रोड वरील दामाजी सहारे यांचे शेताजवळ च्या नहरात गेला असता मातीने भरलेले हाथपाय धुत असताना पाय घसरून अचानक खाली पडला. तेथे तो पडुनच राहीला. काही वेळाने गावातील व्यकती ला तो नहरात पडुन दिसल्याने बखारी च्या पोलीस पाटील नरेंद्र पांडे व सरपंच नरेश ढोणे हयाना बोलावुन पाहीले तर तो मृत अवस्थेत दिसल्याने ही माहीती पोलीस पाटीलानी पांडे पारशिवनी पोलीसा स्टेशन ला दिल्याने घटनास्थळी पारशिवनी पोलीस स्टेशनचे पोहवा गंगाप्रसाद वरकडे, प्रफुल जगनाडे सहकर्मचा-यास पोहचुन शिवदास पुरेना चा मृतदेह पारशिवनी उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेद ना करिता नेण्यात आला. पारशिवनी पोलीसानी मृतकाचा साळा ऋषीकेश माडवे यांच्या तोडी रिर्पोट बयाना वरून पोस्टे ला मर्ग दाखल केला आला आहे. 

       बखारी येथील शेतमजुर शिवदास पुरेना यांची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने गावातील शेतात मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचे पालन पोषण करित होता. त्याला फिट (मिरगी) कधी कधी येत होती. नहरात हाथपाय धुताना पाय घसरल्यावर त्यास फिट येऊन सुध्दा तो खाली पडुन मुत्यु पावला असल्याचे बोलल्या जात आहे. परंतु त्याच्या मागे मंद बुध्दी पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार असल्याने या परिवाराचा पालनपोषण करणारा शिवदास पुरेना चा नहरात पडुन आकस्मिक मुत्यु झाल्याने पेंच पटबंधारे विभागाने व शासनाने मुतकाच्या परिवारास आर्थिक मदत करावी. अशी मागणी बखारी सरपंच श्री नरेश ढोणे हयानी ग्रामस्थाच्या वतीने केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com