पारशिवनी:-पंचायत समिती पारशिवनीच्या सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील उर्वरित कालावधीसाठी आज शनिवार १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे.
तहसीलदार प्रशांत सांगड़े यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. असुन पंचायत समिती कार्यालय चा सभागृहात आज सकाळी११ वाजता ते १ बाजे पर्यत नाम निर्देशन वाटप व स्विकारणे होईल प स सभागृहात .३ वाजता विशेष सभा प्रारंभ होईल यात प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी वेळ३.०५ ते ३.१५ पर्यत नाम निर्देशन पत्राची छाननी घेण्याची वेळ राहील आणि ३.१५ ते ३.३० बाजे प्रयत नाम निर्देशन पत्र माधारी घेण्याची वेळ असुन ३.४५ वाजता आवश्यकता असल्यास निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहीती निवडणुकी अधिकारी प्रशांत सागडे यांनी दिली
पारशिवनी पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग राखीव असल्याने ही निवडणूक पक्षश्रेष्ठीं बरोबरच पंचायत समिती सदस्यांसाठी त्रासदायक ठरणार नाही कारण
८ सदस्यीय पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ७, भाजप १ असे संख्याबळ आहे. त्यामुळे , सभापती उपसभापती एकाच पक्षाचे काग्रेस च्या व्यक्तीचा होणार, हे निश्चित आहे
गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे ६, सेनेकडे १ आणि भाजपकडे १असे संख्याबळ होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण धोरणामुळे १ पंचायत समिती पदांसाठी पोटनिवडणूक झाली. त्यामुळे शिवसेना चे एक पद होते तेही एक पंचायत समितीची जागा गमवावी लागली. काग्रेस नी ही जागा ताब्यात घेऊन पंचायत समिती पारशिवनी मध्ये परिणामी, काँग्रेस ६वरून ७ आली. सेना ० भाजप-१ सदस्यांची झाली. तर सभापती आणी उपसभापती दोन्ही पद काग्रेस चे राहणार हे निश्चित आहे व बहुतेक निवडणुक सभापती आणी उपसभापतीपदा बिन विरोध होणार असे चित्र स्पष्ट आहे.
काँग्रेसच्या निवर्तमान सभापती मिना कावळे पुन्हा दावा करू शकतात. नव्या नावांमध्ये काँग्रेसच्या ही निकिता सिताराम भारदाज, आमडी, मंगला उमराव निबोने नयाकुंड आणि तुलसी प्रदिप दियेवार यांची नावे समोर आहेत. किवा तत्कालिन उपसभापती चेतन देशमुख किवा संदिप भलावी, करुणा भोवते हे सभापदी पदी निवड होऊ सकते अशी चर्चा आहे.