हॉलीबॉल स्पर्धेत नंदलाल पाटील कापगते विद्यालय अव्वल…

 निलय झोडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा वयोगट 19 वर्षे खालील क्रीडा संकुल साकोली येथे पार पडले.

          या स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तालुक्यातील सर्वच शाळांनी चित्तथरारक खेळ करीत प्रेक्षकांचे मने जिंकली. हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील विद्यार्थ्यांनी उत्तम अशी कामगिरी करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा क्रीडा स्पर्धेकरिता खेळाडूंची निवड करण्यात आली. 

          यामध्ये निकेश कुरसुंगे, पुष्कर गिरीपुंजे, अंशू भेंडारकर, देवांस दोनोडे ,केतन बडवाईक, सौरभ हत्तीमारे,मोहित लांजेवार, वेदांत देशमुख, रोशन गहाणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

           विजय खेळाडूंचे विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती आर बी कापगते क्रीडा शिक्षक राजेश कापगते, आर.व्हि.दिघोरे , डी.एस.बोरकर, डी.डी. तुमसरे, एस.व्ही कामथे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.