युवराज डोंगरे
उपसंपादक
खल्लार :- अंजनगाव तहसिल मध्ये पुरवठा निरीक्षक गोडाऊनचा पदभार सांभाळत कार्यरत असलेले नारायण काकडे यांची अंजनगाव येथून बदली झाली आहे. त्यांना बिड जिल्ह्यातील तालुका धारूर पुरवठा निरीक्षण या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मुर्हा येथील जगदंबा देवी व श्री. संत झिग्राजी महाराज संस्थानचे वतीने नारायण काकडे व परिवारांचा अंजनगाव सुर्जी तालुक्यात चांगला कार्यकाळ गेल्याने संस्थांनी निरोप पदोन्नती झाल्यामुळे सत्कार व अभिनंदन केले.
संस्थानचे वतीने अध्यक्ष पखान तसेच सचिव पांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गणपती बोराळा येथे तालुक्यातील रास्त भाव दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भांबुरकर उपाध्यक्ष देविदास ढोक सचिव गोपाल बांबुळकर, संतोष जयस्वाल, अनिल राऊत, राजेश ब्रहानपुरे, विजय पवार, लोखंडे, वाघमारे, सातव, अनिल बोंद्रे, संदीप जाधव, लड्डा, कलीम बेग, मोहम्मद नासिर, दिपक शर्मा, संघटनेचे सदस्य गण हजर होते. कार्ड लिपिक तथा पुरवठा निरीक्षक निखिल मनहोरे, विजय हेन्ड उपस्थितीत होते. काकड यांचा निरोप समारंभ व पदोन्नती झाल्यामुळे अभिनंदन सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आले.