काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकोप्याने पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज… — गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे प्रतिपादन…

         पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा

             दखल न्यूज भारत

देसाईगंज :- देशातील लोकशाही धोक्यात आली असतांना काँग्रेस पक्षच विचारधारेची लढाई लढून लोकशाही वाचवू शकतो असा लोकांत विश्वास निर्माण झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीचे बदलते वारे काँग्रेसच्या दिशेने वाहु लागले आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेता काँग्रेस कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकारण न करता एकोप्याने पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

           ते काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन मंदिर सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते. 

            यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, राजेंद्र बुल्ले, डाॅ. शिलु चिमुरकर, वामन सावसाकडे, माधवराव गावळ, नंदु नरोटे, नरेंद्र गजपुरे, शहजाद शेख, लिलाधर भर्रे, महादेव कुंमरे, पुष्पा कोहपरे, आरती लहरी, ममता पेंदाम, भारती कोसरे, गीता नाकाडे, वैष्णवी आकरे, नितीन घुले, भुमेश्वर शिंगाडे, देवा सहारे,अमित सलामे आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

           दरम्यान आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माजी आमदार आनंदराव गेडाम म्हणाले की कोणतीही लढाई मताभेदातुन लढलीच जाऊ शकत नाही तर ती समन्वयातूनच लढली जाऊ शकते. याकरीता पिंकु बावणेने घेतलेले अथक परिश्रम बोलके आहे. चांगले दिवस आलेत म्हणून हुरळुन न जाता एकोप्यातुन समन्वयाने निवडणुकीला सामोरे गेल्यास अनेक समस्यांची सोडवणूक करणे सोपे होईल. यास्तव सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.

         कार्यक्रमाचे संचालन पंकज चहांदे यांनी, प्रास्ताविक श्याम मस्के यांनी तर आभार मेघा सावसाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.