रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढणार…

          पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी देसाईगंज/वडसा

             दखल न्यूज भारत

देसाईगंज :- लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.

          महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यामुळेच महाविकास आघाडीचे ३० उमेदवार निवडून आले आहेत.या विजयात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चा खारीचा वाटा आहे.

              आता विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने रिपब्लिकन पक्षाला (खोरिपा) सन्मानपूर्वक जागा (वाटा) दिल्या पाहिजेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते भेटायला तयार नाहीत त्यामुळे त्यांना रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)ला आघाडीत सामील करून घेण्याची इच्छा नसल्यास त्यांनी तसे कळवावे आम्ही राज्यात स्वबळावर ४० जागा लढविण्याची तयारी करत आहोत असे रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आ.उपेंद्रजी शेंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. 

          त्याच बरोबर रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि २५ सप्टेंबर २०२४ पासून होत आहे.

           संपूर्ण कार्यकर्त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळा प्रत्येक गावा गावात जयंती साजरी करून त्यांच्या कार्याची त्यांचा त्याग समाजातील आजच्या पिढीला माहिती व्हावी त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करावा आणि निष्ठावंत कार्यकर्ते घडवावे असे आवाहन देसाईगंज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

          देशात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.त्यामुळे आपण यावेळेस खोरीपा पक्षाच्या अस्तित्वासाठी येणारी विधानसभा निवडणूकित उमेदवार देणार असेही माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

           यावेळी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर,कामठी,उमरेड ह्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असल्याचे आ.उपेंद्रजी शेंडे यांनी सांगितले. 

         बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे मुंबई,महाराष्ट्राचे सरचिटणीस जीवन बागडे, डॉ.मिलिंद रंगारी गोंदिया जिल्हा प्रभारी इंजि.मिलिंद मेश्राम, नरेश रामटेके तालुका अध्यक्ष ब्रम्हपुरी, पद्माकर रामटेके तालुका सरचिटणीस ब्रम्हपुरी, प्रशांत डांगे शहर अध्यक्ष ब्रम्हपुरी रक्षित रामटेके युवा अध्यक्ष ब्रम्हपुरी आदी उपस्थित होते.