तान्हा पोळा आणि भिसीकरांची आत्मियता,”अद्भुतरम्य!.. — डिजेंचा ताल,बॉन्डचा सुसंवाद आणी तरुणाईची साद,”अतिशय उत्साहवर्धक.. — आकर्षक नंदीबैल व बघणाऱ्याची अफाट गर्दी… — डॉ.सतिश वारजूकर,माजी आमदार मितेश भांगडिया,राष्ट्रीय कांग्रेस पक्ष पदाधिकारी धनराज मुंगले,राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष पदाधिकारी अरविंद रेवतकर यांची ताना नंदीबैल उत्साहाला भेट… — ठाणेदार प्रमोद राऊत टिमसह सुरक्षेसाठी दक्ष…

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

            विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्मियतेचा बैलपोळा व नंदीबैल पोळा हा सण महत्वपूर्ण..दोन दिवस चालणारा हा सण शेतकरी बांधव सदभावना पुर्वक मोठ्या उत्साहाने साजरा करतात.तद्वतच एकमेकांना अक्षता लावत मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतात.

               बैलपोळा निमित्याने एकमेकांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा सखोल जिव्हाळ्याची आणि ऋणानुबंध जपण्याची आहे..तर दुसरीकडे पाळीव प्राणी असलेल्या बैलांप्रती सदभावना पुर्वक आदरभाव जोपासण्याची आहे.

        माझ्या मित्रांनी मला सांगीतले होते की,चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर तालुक्यातील अप्पर तालुक्याचे ठिकाण असलेल्या मौजा भिसी येथील तान्हा पोळा म्हणजेच नंदीबैल पोळा एकदा तरी बघा.‌मी प्रथमतः आरोग्याचे कारण सांगून त्यांना म्हटले‌‌ होते नाही.पण त्यांच्या भावनांचा अनादर न करता धीरगंभीर पणे आज भिसी येथील नंदीबैल पोळा उत्सव मनात घेतलाय.

              राज अँन्ड धुमाल गृप डिजे व बॉन्ड पार्ट्री लाखांदूर,एचबिएल धुमाल डिजे व बॉन्ड पार्टी घुग्गुस,सुरज डिजे व बॉन्ड पार्टी कुही आणि इतर बॉन्ड पार्टी अंतर्गत भिसी येथील तान्हा पोळा निमित्ताने तरुणांनी दिलेली मनमोहक साद हजारो नागरिकांच्या आकर्षणाची केंद्रे ठरली व हजारो तान्ह्या नंदी बैलांना देण्यात आलेली आदरभावाची वंदना प्रत्यक्ष अनुभवता आली.

            अर्थात डिजेचा ताल,बॉन्डचा सुसंवाद,आणि सर्व तरुणाईची साद,”अतिशय उत्साह वर्धक होती,मोहक होती..

             भिसीच्या मुख्य रस्त्याने आकर्षक नंदीबैल पोळा बघणाऱ्याची अफाट गर्दी हे सांगून जात होती की,तान्ह्या पोळ्या बाबत भिसीकरांची आत्मियता,”अद्भुतरम्य,आहे…

            भिसीकरांच्या नंदीबैल पोळ्याला चंद्रपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रीय कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर,माजी विधानपरिषद आमदार व उधोगपती मितेश भांगडिया,राष्ट्रीय कांग्रेस पार्ट्रीओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्य सचिव धनराज मुंगले,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस व भिसीचे माजी प्रथम नागरिक अरविंद रेवतकर व इतरांनी भेट देत भिसी करांसी सुसंवाद साधला व नंदीबैल धारकांना क्रमांकवार आपापल्या पद्धतीने आकर्षक बक्षिसे दिली व इतर नंदीबैल जनांनाही बक्षिसे घोषित केली..

           नंदीबैल उत्साहाला गालबोट लागू नये म्हणून भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद राऊत यांनी आपल्या पोलीस व होमगार्ड सहकार्याच्या मदतीने चोख बंदोबस्त केलाय व जातीने स्वतः लक्ष ठेऊन होते.