ऐन पोळ्याच्या सणाला बैलगाडी गेली पुरात वाहून… — गावकऱ्यांच्या मदतीने बळीराजा, सर्जा-राजा बचावले…

 

प्रितम जनबंधु

संपादक 

            चंद्रपूर जिल्ह्यात ऐन पोळ्याच्या सणाला दुर्घटना घडली आहे. मात्र, गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. पोळा सणाच्या दिवशी एकीकडे सर्जा- राजाला सजविण्यात शेतकरी गुंतले होते. त्याचवेळी बैलगाडीसह शेतकरी पुरात ओढला गेला. सर्जा-राजा बैलजोडीसह सह शेतकरी पुरात वाहून जात असताना गावकरी मदतीला धावून गेले. गावकरी वेळेत पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना चंद्रपुरातील कोरपना तालुक्यातील नांदा येथे गुरुवारी घडली.

          सर्जा-राजा आणि शेतकऱ्याला सुखरूप पुरातून बाहेर काढण्यात आले आहे. किसन चौधरी असे पुरातून बचावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोरपना तालुक्यातील नांदा गावाजवळील नाल्याला पूर आला. गुरूवारी पोळ्याच्या दिवशी या नाल्यातून बैलगाडी काढत असताना बैलगाडी वाहून गेली. शेतकरी स्वतःचा जीव वाचवित नाल्याचा बाहेर निघाला. मात्र सर्जा-राजा पुरात अडकला असल्याने आपल्या जिवलग सर्जा-राजाचा जीव वाचविण्यासाठी शेतकऱ्याने आरडाओरोड केली. आवाज ऐकून आसपासचे गावकरी, शेतकरी मदतीला धावून गेले. स्वतःच्या जीव धोक्यात टाकून त्यांनी बैलांना पुरातून बाहेर काढले असल्याचे समजते.