कमलसिंह यादव

पारशिवनी तथा नागपूर ग्रामीण प्रतिनिधी..

 

पाराशिवनी:- तालुक्यातिल बनपुरी येथे राहणारे कल्पेश बावनकुळे यांच्या परिवारासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी व संतापलेल्या नागरिकांनी पोलीस निरिक्षकांना आज निवेदन दिले आणि आरोपींना तात्काळ अटक करावी असी मागणी केली.तसेच प्रहार जनशाक्ती संगठनचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे यांनी आज दुपरी नागपुर ग्रामिण पोलिस अधिक्षक यांना भेटुन कल्पेशच्या मारेकरी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी व कल्पनेच्या कुटुंबियांना न्यायातंर्गत दिलासा देण्याची मागणी केली. 

             याचबरोबर कन्हान परिसरातील बोर्डा रोड वर दोन अज्ञात आरोपी ने धारदार शस्त्राने वार करुन कल्पेश बावनकुळे याची निघृण हत्या केल्याने संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी व संतापलेल्या नागरिकांनी पोलीस निरीक्षक विलास काळे यांची भेट घेऊन लक्षात आणून दिले.सदर गंभीर विषयावर चर्चा करताना घटनेतील आरोपींचा लवकरात लवकर शोध लावून मृतकाच्या परिवाराला योग्य न्याय देण्याची मागणी रेटून धरली.

        परिसरात कायदा सुव्यवस्था कडक करुन मोठ्या प्रमाणात सुरु असलेले अवैध धंधे बंद करण्याची मागणी केली सुध्दा आहे.

         बोर्डा रोड वरील भारत पेट्रोल पंप समोर,साटक – बनपुरी रहिवासी मृतक कल्पेश भगवान बावनकुळे या व्यक्तीची दोन अज्ञात आरोपींनी निघृण हत्या करून घटनास्थळा वरून पसार होण्यास ते यशश्वी झाले.

      कन्हान पोलीस प्रशासनाने त्यांचा तपास सुरु केला,परंतु घटनेला चार दिवस लोटुन सुध्दा आरोपीचा सुराग पोलीसांच्या हाती न लागल्याने कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

     हत्याची घटना परिसरात आगी सारखी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन स्थानिक नागरिक पोलीस प्रशासनाबद्दल असंतुष्ट असुन,घटनास्थळा पासून काही अंतरावर मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे रात्रीच्या वेळी अवैध धंदे सुरु असताना कन्हान पोलीस विभाग कारवाई का करत नाही? या अनुषंगाने चर्चेला उधाण आले आहे.

      बोर्डा मार्गावर अनेक छोटे-मोठे खेडेगावं असुन सामान्य नागरिक दिवस भर ह्या कांद्री – बोर्डा महामार्ग ने आपल्या दररोजच्या कामाने बाहेर जात असतात.तद्तच याच मार्गाने सायंकाळी त्याचा परतीचा प्रवास असतो.

      कितीतरी जेष्ठ नागरिक व्यायाम म्हणून त्या रस्त्यावर सकाळी – सायंकाळच्या वेळी फिरायला येत असतात.या घटनेने आजू बाजूच्या संपूर्ण परिसराला हादरवून टाकले असुन स्थानिक नागरिक रात्रीच्या वेळी सुरक्षित नसल्याचे पुढे आले आहे.यामुळे भाजपा कन्हान,पारशिवनी तालुकाच्या पदाधिकाऱ्यांनी व संतापलेल्या नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्यांपुढे सुरक्षे सबंधातील समस्यांचा पाढाच वाचला. 

     या प्रसंगी राजकिय पक्षाचे नेते कार्यकर्ते,सामाजीक संगठन पदाधिकारी व बनपुरी गावातील व जवळपास गावातील नागारिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News