धानोरा /भाविक करमनकर 

 

आदिवासीची संस्कृती आणी रूढि, प्रथा, ओळख, भाषा, रोजगार, आरोग्य, शिक्षण पाणी इतर सर्व मुद्दे व त्यांचे सामीत्व हक, अधिकार कायम टिकविण्याकरीता संयुक्त राष्ट्र द्वारा १३ सप्टेंबर २००७ ला ”आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस’ ची घोषणा केली. या अनुषंगाने ग्रामपंचायत मोहगाव ने दिनांक २९/०८/२०२२ का विशेष ग्रामसभेचे नोटीस काढून दिनांक. १३/०९/२०२२ ला विशेष ग्रामसभेचे आयोजन केले.

 

मोहगाव ग्रामसभेनी दिनांक ११/०२/२०२१ चे ठरावानुसार सविधानाच्या पाचवी अनुसूची अनुछेद २४४(१), उपखंड ५, अनुसूची १३ (३) क, १९ (५) (६) अनुसूची ११ मधील अनु २४३ (छ), अनुछेद१२,३५० (क) व कलम ३५०क , व केंद्रीय पेसा कायदयातील अनू ४च्या ग्रामसभेच्या मार्फतीने पारंपारीक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल स्कूल, मोहगाव ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व मा. महामहिम राज्यपाल यांचेसमवेत सर्व स्तरावर त्याचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

 

भारतीय संविधानाच्या अनुछेद ३५० (क) नुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिले पाहीजे असा स्पष्ट उल्लेख संविधानात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणापत्रातील अनुच्छेद १२(१) व १४(१) नुसार आपली आदिवासीची भाषा, लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार UNO ने आदिवासीना दिलेला आहे. तसेच आज ग्रामसभेला सर्वोच्च सभेचा दर्जा संविधानाने दिला आहे. त्यामुळे स्थानीक भाषेत स्थापीत केलेल्या पारंपारीक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल स्कूल मोहगाव ला शासकीय मान्यता देन्यात यावी. या अधिकारासाठी आज विशेष ग्रामसभेचे आयोजन होते.

 

समेत अध्यक्षस्थानी लिलाबाई वासुदेव आतला हे होते. तVर प्रमुख अतिथी – अंताराम आतला गावप्रमुख , अलसु चैतू पावे पुजारी, सनकू नवलू आतला गाव भूम्या,सु. एस चलाख केंद्रप्रमुख पेंढरी, मेश्राम मुख्याध्यापक पावेटोला, शिंदे सहायक शिक्षक माहेगाव, समर्थ वनपाल पेंढरी, आत्राम वनरक्षक ,सोरते वनरक्षक, लेकामी वनरक्षक, मोहुर्ले कृषी सहायक, धनाय टेकाम आशा वर्कर उपस्थित होते.

 

दिनांक २२/०८/ २०२२ रोजी गट शिक्षणाधिकारी पं स धानोरा यांनी ग्रामसभा मार्फत चालवित असलेल्या शाळेला अनधिकृत घोषीत केले असल्याने, ही शाळा अनधिकृत नसुन अधिकृत आहे या बाबत ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली ग्रामसभेच्या हक्क आणी अधिकाराचे हनन करून ग्रामसभा मार्फत चालवित असलेला शाळेला अनधिकृत ठरवून शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.

करीता भारतीय दंड संहिता १८६० चा कलम १६६ आणी १६६ अ नुसार कार्यवाही करण्याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात अणि सोबतच २८ जुन २०२२ रोजी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसुचीत वनसंवर्धन नियम २०२२ रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

तसेच इतर सर्वच विषयावर साधकबाधक चर्चा कण्यात आली सभेचे सुत्र संचालन व नियोजन श्री जयंत मेश्राम ग्रामविकास अधिकारी मोहगाव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री मन्साराम मेश्राम मु.अ पावेटोला यांनी ,सभेच्या यशस्वीतेकरीता श्री बावसु पावे, देवसाय आतला, दिनेश टेकाय, मनीराम आतला, काशीनाथ आतला, उत्तम आतला, नाजुक आतला योगीता भैसारे, मनोहर आतला,कोदू आतला व इतरांनी सह‌कार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com