चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

लाखनी:-

   ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा तर्फे गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात दत्त मंदिर परिसरातील दत्तमंदीर गणेश मंडळ तसेच सिद्धीविनायक गणेश मंडळ ,गुरूकुल आय. टी. आय.लाखनी येथील गणेशोत्सवात व रेंगेपार कोहळी बाल युवक गणेशोत्सव मंडळात निसर्ग पर्यावरण ,खगोल अंधश्रद्धा तसेच साप व इतर प्राणी पक्षी अंधश्रद्धा त्याचबरोबर 13 कलमी जादूटोणा विरोधी कायद्यावर प्रबोधन कार्यक्रम ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह व अभा अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. अशोक गायधने व तालुका संघटक अशोक वैद्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच लाखनी नगरपंचायत नगरसेवक संदीप भांडारकर,निसर्गमित्र पंकज भिवगडे,निसर्गमित्र मयुर गायधने,निसर्गमित्र विवेक बावनकुळे,निसर्गमित्र सलाम बेग,योगेश वंजारी,धनंजय कापगते,राकेश हुमे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या कार्यक्रमाला गुरुकुल आय टी आय लाखनी, मानव सेवा मंडळ लाखनी,नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था (नेफडो जिल्हा भंडारा)यांचे सहकार्य लाभले.

 यावेळी ग्रीनफ्रेंड्स व अभाअंनिसचे तसेच नेफडो जिल्हा भंडाराचे कार्याध्यक्ष प्रा. अशोक गायधने यांनी निसर्ग ,साप, पक्षी, प्राणी,खगोल यावरील विविध अंधश्रद्धा ,गैरसमज याचे मार्गदर्शन प्रकाशचित्राद्वारे केले त्याचबरोबर 13 कलमी जादूटोणाविरोधी कायद्यावर सुद्धा मार्गदर्शन रंगीत चार्टद्वारा केले.तालुका संघटक अशोक वैद्य यांनी वैज्ञानिक प्रयोग सादर करीत विविध बुवाबाजीची उदाहरणे सांगत अंधश्रद्धा दूर करण्याचा सल्ला नागरिकांना दिला.

   यानंतर नुकतेच 24 तासात पकडलेले विषारी बिनविषारी साप,घोरपड प्रत्यक्षरीत्या गणेशभक्तांना दाखवून त्यांची भीती दूर करण्याचे कार्य निसर्गमित्र पंकज भिवगडे,मयुर गायधने,सलाम बेग,निसर्गसंशोधक विवेक बावनकुळे,योगेश वंजारी,राकेश हुमे,धनंजय कापगते यांनी केले तसेच बिनविषारी साप काही युवक युवतीं तसेच नागरिकांनी पकडून त्यांची भीती गैरसमज दूर केले. त्यानंतर सर्व सापांना जंगलात सोडून देण्यात आले.यावेळी समयोचित मार्गदर्शन नगरसेवक संदीप भांडारकर यांनी सुद्धा केले.

 कार्यक्रमाला गुरुकुल आय टी आय चे प्राचार्य खुशालचंद मेश्राम,कोषाध्यक्ष जयश्री मेश्राम,गुरुकुल स्टाफचे वर्षा वंजारी,वैशाली डुंभरे, मडावी मॅडम,दत्त मंदिर गणेश मंडळाचे पदाधिकारी मुन्ना वरवाडे, स्वप्नील भांडारकर, सुरज लांडगे सिद्धी

विनायक गणेश मंडळाचे देविदास गिर्हेपुंजे, मंगेश निर्वाण,सुरज पाखमोडे, एकता युवा व क्रिडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ रेंगेपार कोहळीचे पदाधिकारी निसर्गमित्र धंनजय कापगते,उमेश बोरकर,जयंत धारणे, जि प आजगावचे मुख्याध्यापक मोहन कापगते ,पंकज देशमुख इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com