चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

लाखनी:-  

  वनक्षेत्रकार्यालय लाखनी तर्फे व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनीच्या सहकार्याने समर्थ महाविद्यालयात भारतातून नष्ट झालेल्या चित्ता प्राण्यांबद्दल तसेच त्याच्या मध्यप्रदेशातील कुनो पालघर येथे होत असलेले पुनर्वसन याबद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

 या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह प्रा.अशोक गायधने हे होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाखनी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी सुरज गोखले तर प्रमुख अतिथीमध्ये समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डी डी कापसे, प्रणय भांडारकर,लाखनी वनक्षेत्र सहाय्यक जी एम बघेले, जांभळी क्षेत्र सहाय्यक एस बी उईके,प्रा.मोहन कावळे,लाखनी बिटरक्षक किशोर सानप,के आर कावळे बिटरक्षक बरडकिन्ही,एन बी उशीर बिटरक्षक उमरझरी,ए ए रंगारी बिटरक्षक मुरमाडी तुपकर,एम एल शहारे बिटरक्षक गडेगाव,राधेश्याम भराडे तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे निसर्गमित्र पंकज भिवगडे, निसर्गमित्र मयुर गायधने,निसर्गसंशोधक विवेक बावनकुळे हे उपस्थित होते.

     कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे कार्यवाह व लाखनी नगरपंचायतचे ब्रँड अँबेसेडर प्रा.अशोक गायधने यांनी भारतातून चित्ता नष्ट होण्यामागचा विस्तृत 400 वर्षापासूनचा इतिहास विविध उदाहरणे देऊन तसेच पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन द्वारा सादरीकरण केले.त्यानंतर मागील 70 वर्षात चित्ता भारतात आणण्यासाठी केले गेलेले प्रयत्न ,चित्ता प्राण्याचे पुनर्वसन करण्यामागची आवश्यकता, राजे महाराजांनी चित्याचा शिकारीसाठी वापर यावर पॉवरपॉइंट द्वारा सादरीकरण तसेच इतर प्राण्याविषयी सुद्धा विस्तृत माहिती दिली.त्याचसोबत ग्रीनफ्रेंड्सच्या आगामी उपक्रमाची माहिती त्यांनी सादर केली.पोहरा येथे सुद्धा असाच कार्यक्रम बिटरक्षक किशोर सानप व निसर्गमित्र मयुर गायधने यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

    कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन के आर कावळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा धनंजय गिर्हेपुंजे, प्रा. किशोर पर्वते,प्रा.बंसपाल तसेच इतर प्राध्यापकवृंदानी अथक प्रयत्न केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News