इमुनिटी पावर वाढवण्यासाठी रानभाजी शिवाय पर्याय नाही :- अनिल किरणापुरे…

 संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

  दखल न्यूज भारत 

            रानभाजी कार्यक्रमाचे अवचित्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालय साकोली मार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) व कृषी विभाग लाखांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल लाखांदूर येथे आयोजित करण्यात आले.

             सदर कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश भाऊ ब्राह्मणकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजना ताई वरखडे सभापती पंचायत समिती लाखांदूर उपस्थित होते.

        कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत छाया कापगते तालुका कृषी अधिकारी लाखांदूर उपस्थित होते.

         प्रमुख अतिथी म्हणून रामचंद्रजी राऊत माजी गटनेते लाखांदूर, अनिल भाऊ किरणापुरे युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी तथा पंचायत समिती सदस्य साकोली, मंगेश भाऊ राऊत पंचायत समिती सदस्य, देविदासजी पारधी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर,  विश्वनाथ जी हजारे सकाळ पत्रकार, विजयजी जाधव सेवानिवृत्त बँक अधिकारी, कोवे तालुका अभियान व्यवस्थापक उमेद , कटबरे तालुका व्यवस्थापक उमेद आदी मान्यवर उपस्थित होते.

        पीएमएफएमइ योजनेचे डी आर पी लाहोटी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

         सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेश भाऊ ब्राह्मणकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्घाटक व समस्त मान्यवर यांनी रानभाजी स्टाल ला भेट देऊन आत्मा व उमेद गटातील महिलांकडून जंगली रानभाज्या व पाककला कृती बाबत माहिती जाणून घेतली.

         त्यानंतर विशेष म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांचे शेवग्याच्या शेंगाची जुडी देऊन स्वागत करण्यात आले.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाया कापगते तालुका कृषी अधिकारी लाखांदूर यांनी केले. प्रास्ताविक मध्ये रानभाजीचे अनन्य महत्व सांगून ओळख करून दिली.  

              उपस्थित मान्यवरांनी सदर कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल जवंजार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक लाखांदूर यांनी केले. आभार जाधव साहेब यांनी मानले.

           सदर वेळी आत्मा गटातील महिला पुरुष तसेच उमेद च्या कृषी सखी,पशु सखी व कॅडर्स यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

            सदर कार्यक्रमात स्टालवर 25 ते 30 प्रकारच्या ठेवल्यात आल्या. तसेच चार ते पाच महिलांनी रानभाज्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करून विक्रीस आणले. कार्यक्रमात 85 महिला व पुरुष उपस्थित होते.

             सदर कार्यक्रमाला कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक अरविंद राऊत, प्रशांत रामटेके व कृषी सहाय्यक दिनेश मते व गिरेपुंजे मॅडम व गाडी ड्रायव्हर महेश बोरकर तसेच उमेद चे प्रभाग समन्वयक योगेश चुटे, प्रकाश धुर्वे, रवी नालाबंडी आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.