अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बिरसा मुंडा चौक, पाटील चौक व ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले.
सर्वप्रथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोसबी येथील ध्वजाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिनेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक श्री. सोनटक्के सर , श्री. ठेंगरे सर, श्री. शेंडे सर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी पदाधिकारी , आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका ,मदतनीस व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर जिल्हा परिषद शाळेतून रॅली निघून बिरसा मुंडा चौक येथे पोहोचून बिरसा मुंडा चौकातील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विनोद मानकर यांच्या हस्ते बिरसा मुंडा चौकातील ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर रॅली पाटील चौकात पोहोचून पाटील चौकातील ध्वजाचे ध्वजारोहण श्री. बुधराज गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रॅली ग्रामपंचायत कार्यालय कोजबी येथे पोहचून ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण सौ. कविता ताडाम सरपंच गट ग्रामपंचायत कोजबी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य गण उपस्थित होते. त्यानंतर रॅली जिल्हा परिषद शाळा कोसबी च्या प्रांगणात पोहोचली व शाळेमध्ये देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ. कविता ताडाम ह्या होत्या, तर उपाध्यक्ष श्री. दिनेश बनकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रमुख अतिथी श्री. विनोद मानकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष, उपसरपंच श्री. प्रलय चहांदे, तसेच ग्रामपंचायत कोजबी येथील संपूर्ण पदाधिकारी, आरोग्य सेविका धोटे मॅडम, ग्रामपंचायत सचिव ढोरे मॅडम , तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष ईश्वर मेश्राम, रोहिदास सहारे, गुलाब ताडाम, अश्विन बोदेले, गुलाब जुमनाके , पोलीस पाटील सौ. माधुरीताई सहारे, आरोग्य सेवक श्री. बोरकर साहेब, श्री. नैताम साहेब अंगणवाडी सेविका ,सौ. मुल्लेवार मॅडम, सौ. घोडाम मॅडम ,सौ. नंदेश्वर ताई, मुल्लेवार ताई, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला , युवक , युवती तसेच आजी माजी पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांची मार्गदर्शन झाले. व विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन जी. प. उच्च प्राथमिक शाळा कोजबी येथील सहाय्यक शिक्षक श्री. प्रशांत ठेंगरी सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद, आरोग्य उपकेंद्र येथील कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय येथील पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिपाई मोरेश्वर सयाम , रोशन दुमाने व गावातील नागरिकांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.