नंदलाल पाटील कापगते विद्यालय येथे 78 वा वर्धापन दिन साजरा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

 साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय व उच् च माध्यमिक महाविद्यालय साकोली येथे भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. 

        स्वातंत्र्याच्या उत्साहाने व देशभक्तीच्या चैतन्याने ध्वज स्तंभाचे पूजन व ध्वजारोहण कार्यक्रम विद्यालयाचे प्राचार्या श्रीमती आर.बी. कापगते यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.    

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. हेमकृष्णजी कापगते (माजी आमदार साकोली), मुरलीधरजी गजापुरे सर(सेवानिवृत्त शिक्षक ), प्रदीपजी गोमासे सर (सेवानिवृत्त प्राचार्य), संजयजी कापगते सर (सेवानिवृत्त प्राचार्य), टी. जी. परशुरामकर सर (सेवानिवृत्त प्राचार्य), शेंडे सर (सेवानिवृत्त प्राचार्य), डी.डी.कोसलकर ,(सेवानिवृत्त प्राचार्य), एस. एच. कापगते सर, एन.बी. नाकाडे सर, एम.व्ही. कापगते सर, काशीवार सर, साखरे मॅडम, व्यंकटेशजी येवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऋग्वेदजी येवले, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अविश कुमार भैसारे, माता पालक संघाचे अध्यक्षा ज्योतीताई हौसलाल रहांगडाले, अनिताताई पोगळे, तनुजाताई हत्तीमारे, सिमाताई देशमुख, सतीशजी कापगते इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

          कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी -शिक्षक- पालक यांना तंबाखूमुक्त ची सभा देण्यात आली असून आर. एस. पी. च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून प्रमुख अतिथींना मानवंदना देऊन प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले तसेच शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, भाषण, नृत्य इत्यादी सादर केले.

          प्राचार्या श्रीमती आर.बी.कापगते मॅडम यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त होऊन तिरंग्याच्या रूपाने स्वातंत्र्य भारताचे नवीन ओळख भारताला मिळवून दिली, आपल्या देशाला निरक्षरता, अंधश्रद्धा ,लोकसंख्या वाढ, बेकारी, महागाई, भ्रष्टाचार विविध प्रकारचे रोगराई मिळवण्यासाठी प्रत्येकाने आटोक्याने प्रयत्न केले पाहिजे.मी देशासाठी काहीतरी देऊ शकतो याचा विचार प्रत्येक भारतीयांनी प्राणपणाने जोपासण्याची गरज असली पाहिजे ,असे मार्मिक विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या श्रीमती आर.बी.कापगते यांनी व्यक्त केले. 

           कार्यक्रमाच्या संचालन आर.बी.कापगते सर, प्रा. के.जी.लोथे सर यांनी केले. सरते शेवटी कार्यक्रमाचे समारोप प्रसाद वाटप करून वंदे मातरम या गीताने करण्यात आले.