ब्रेकिंग न्यूज… — अशुद्ध पाण्यामुळे हतरू गावात अतिसाराची लागण.. — आदिवासी बांधवांचे आरोग्य धोक्यात.. — याआधी आढाव,खटकाली,दहेंद्रीढाणा,कोफमार आणि आता हतरू अशा अनेक गावांमध्ये अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना झाली अतिसाराची लागण..

अबोदनगो सुभाष चव्हाण

  जिल्हा प्रतिनिधी अमरावती 

       दखल न्यूज भारत 

अमरावती-ः चिखलदरा तालुक्यातील हातरू येथील नागरिकांना व लहान मुलांना अतिसराची लागण झाली असून या ठिकाणी एकूण 52 रुग्ण अतिसराचे निघाले आहेत.या ठिकाणी 11 रुग्ण भरती आहेत.सात रुग्णांना रेफर करण्यात आले आहे.

          हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त दहा बेड असून या ठिकाणी 11 रुग्ण भरती आहेत.तर या केंद्रात विद्युत पुरवठा बरोबर नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात सुद्धा या आरोग्य केंद्रात डॉक्टर उपचार करतात.

        सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.या दिवसात साप,विंचू,तसेच जंगली जनावरांचा या ठिकाणी वावर असतो.अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र हतरू येथे लाईन नसल्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करणे कठीण झाले आहे.

       तसेच रुग्णांना सुद्धा अंधारातच या ठिकाणी राहावे लागत आहे.अशी भयानक परिस्थिती सध्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे.

       त्या ठिकाणी अतिसराची लागण झाल्यामुळे आमदार राजकुमार पटेल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आसोले यांनी सदर आरोग्य केंद्राला भेट दिली असून रुग्णांची स्थिती जाणून घेतली.

        अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ ढोले,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांनीही भेट दिली.

***

बॉक्स..

    विविध वयातील एकूण 52 लोकांना अतिसाराचे लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तीन हातपंप सील केले आहेत.तसेच आजपासून गावात टँकर सुरू केले आहेत,परिस्थिती नियंत्रणात आहे.रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र हातरू तसेच चरणी येथे उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंदन पिंपळकर यांनी दखल न्यूज भारत सोबत बोलताना दिली..

*******

बॉक्स…

   हतरू या अतिदुर्गम आदिवासी गावात दिनांक १३/०८/२४ रोजी अतिसार (डायरीयाची) लागण पसरल्याची बातमी दुपारी दोन वाजता माझ्या कानावर येताच मौजा हतरुला जायला निघालो.चार वाजता हतरु येथे पोहचुन परीस्थीतीचा आढावा घेतलाय.

      जवळ-जवळ ४५ रुग्ण शासकीय रुग्णालय येथे उपाचार घेत असतांना आढळले.दुषित पाणी पिल्यामुळे डायरीया पसरल्याची प्राथमिक माहीती मिळाली.

       ग्रामपंचायत हतरूचे ग्रामसेवक आपल्या कर्तव्यवर गैरहजर असल्याचे आढळुन आले.

त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद अमरावती यांना संम्पर्क साधुन तक्रार केली व कारवाईची मागणी केली.

      प्राशकीय यंत्रणांना योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. 

         रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धीर देऊन सर्व प्रकारची मदत आपण या रुग्णांना करणार आहोत अशी प्रतिक्रिया आमदार राजकुमार पटेल यांनी,”दखल न्यूज भारतला,दिली..