राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव तर्फे पोलीस भरती मैदानी चाचणी करिता येणाऱ्या दुर्गम भागातील उमेदवारांना एक दिवस निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
दिनांक 18 जून 2024 ते 13 जुलै 2024 पर्यंत प्रति दिन 70 ते 100 पर्यंत एकूण 1450 विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. सृष्टी सेलिब्रेशन हॉल सेमाना रोड नवेगाव या ठिकाणी सदर सेवा संस्थेच्या वतीने मोफत देण्यात आली.
या सेवाकार्याला सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव यांनी हॉल उपलब्ध करून देऊन मुला मुलींची एक दिवस थांबण्याची व्यवस्था करण्यात आली केली होती.
यासोबतच एक वेळच्या जेवणाकरिता सुरज कोडापे यांनी विशेष प्रयत्न केले महेंद्रजी ब्राह्मणवाडे ,डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री लीलाधर भरटकर डॉक्टर चेतन कोवे यांनी यात सहकार्य केले.
श्री सुरज कोडापे यांनी अनेकांशी समन्वय साधून प्रत्येक संध्याकाळी उमेदवारांना भरती विषयीक आवश्यक मार्गदर्शन करून सर्वांचे मनोधैर्य वाढवून स्पर्धेमध्ये यश मिळवण्याचे सूत्र सांगितले.
श्री सुरज कोडापे हे स्वतः MPSC उत्तीर्ण असून त्यांची पोलिस विभागात PSI या पदावर निवड झालेली आहे, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या सेवा कार्यात संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच इतर सामाजिक संघटनांनी पाठबळ दिले.
त्याचप्रमाणे उमेश उईके, कुणाल कोवे , वनिशाम येरमे, भरत येरमे, अमरसिंग गेडाम, मुकुंदा मेश्राम सुरेश बारसागडे , पुंडलिक शेंडे, जालिंदर भोयर, अमृत किनेकार रेवनाथ निकुरे यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.तर सतीश कुसराम यांनी उमेदवारांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सहकार्य केले..अजब गजब फूडीज संचालक सतीश भैया यांचेही विशेष सहकार्य लाभले..
या सेवा कार्याकरिता आर्थिक सहकार्य देणाऱ्या तसेच या सेवाकार्यात प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
दिनांक 20 जुलै 2024 व 28 जुलै 2024 ला गडचिरोली येथे होणाऱ्या पोलीस भरती लेखी चाचणी करिता दुर्गम भागातून सिरोंचा भामरागड, ऐटापल्ली कोरची , अहेरी या भागातून येणाऱ्या उमेदवारांकरिता एक दिवस निवासाची व भोजनाची मोफत सेवा देण्यात येईल.
यापुढेही वरील दुर्गम भागातून कार्यालयीन काम करिता व शालेय कामाकरिता येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना एक दिवसीय निवास व भोजनाची मोफत सेवा ही संस्था निरंतर देत राहील..