युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अमरावती शहरातील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्रवीण सरोदे,सुनील वानखडे,भूषण राऊत,अशोक वासनिक यांनी आज दिनांक 14 जुलै रविवार रोजी दुपारी 2वाजता आदरणीय जोगेंद्रजी कवाडे सर यांचे नेतृत्व स्वीकारून पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
सर्व प्रवेशितांचे चरणदास इंगोले यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचे निळे दुपट्टे घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तर धडाडीचे युवा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण महादेवराव सरोदे यांची शहराच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना चरणदास इंगोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सादर करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष एडवोकेट दीपक आकोडे शहर कार्याध्यक्ष वासुदेव सामटकर जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब इंगोले व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.