करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थी ससंदेची स्थापना.. 

       रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

     चिमूर /- गांधी सेवा शिक्षण समिती समितीद्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिम्मित महाविद्यालयात करिअर कट्टा विद्यार्थी संसदेची स्थापना प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात झाली.

       आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल म्हणाले की करियर कट्ट्यामुळे विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता तसेच रोजगाराप्रती सकारात्मक दृष्टीकोन वाढेल.अनेक जिवंत उदाहरण देऊन त्यानी परिश्रमाचे मानवी जीवनातील महत्व सांगितले.

       महाविद्यालयीन युवकांनी आपले ध्येय गाठण्यासाठी सतत परिश्रम केले पाहिजे.मुख्य वक्ते प्रा.आशुतोष पोपटे इंग्रजी विभाग प्रमुख यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सर्वसमावेशक अभ्यास करावा,आपली कम्युनिकेशन स्किल वाढवावी,ग्रामीण युवक जागतिकीकरण स्पधेत टिकला पाहीजे,विविध स्पर्धेची तयारी करताना युवकांनी प्रसिध्द वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत जो सशक्त असतो तोच स्पर्धेत टिकतो हे लक्षात घेतले पाहिजे असे सांगितले.

       उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बनसोड यांनी आपल्या मार्गदर्शनात ग्रामीण भागातील युवकानी स्पर्धा परिक्षा व उद्योजकता याविषयी माहिती व ज्ञान मिळविले पाहिजे,अपयश आले तरी अभ्यासात सातत्य असले पाहिजे. 

      करिअर कट्टा उद्योजक आपल्या दारी या उपक्रमाचे समन्वयक डॉ.राजेश्वर राहांगडाले यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी करियर कट्टा उपक्रमाचा उद्देश,स्पर्धा परिक्षा व उद्योजकता यांचे महत्व सांगितले.सर्व युवकानी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

        सुत्रसंचालन करिअर कट्टा उद्योजक आपल्या दारी या उपक्रमाचे समन्वयक प्रा.पितांबर पिसे यांनी केले.आभार संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग डॉ.उदय मेंडुलकर यांनी केले.या प्रसंगी करिअर कट्टा विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली. 

       विद्यार्थी मुख्यमंत्री म्हणून कु.अंकिता धनगरे यांनी करियर कट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.या कार्यक्रमाला मराठी विभागप्रमुख डॉ.कार्तिक पाटील तसेच डॉ.हरेश गजभिये,डॉ.प्रफुल राजुरवाडे,डॉ.नितिन कत्रोजवार, डॉ.लक्ष्मण कामडी उपस्थित होते.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.