संस्कार पब्लिक स्कूलमध्ये वारकरी बाल मेळावा…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          आषाढी एकादशी निमित्य संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा येथील छोट्या छोट्या बाल गोपाल विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या व व्यास पौर्णिमेच्या पावन पर्वावर पंढरपूरची वारी पालखी सोहळा या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व मोठ्या संख्येत बालगोपाल वारकरी ,विठ्ठल रखुमाई बनत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

           यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्था कोषाध्यक्ष वामनराव फाये तसेच संस्था सचिव दोषहर फाये संस्था सहसचिव व प्राचार्य श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा नागेश्वरजी फाये , प्राचार्य संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा देवेंद्रजी फाये व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

          या कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका प्रीती गिरडे तसेच आभार पारधी शिक्षिका यांनी केले.