नागपूर येथे तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार…
युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमानाने द्वारा प्रस्तुत संतु-तुकाची जोडी,लावा नामाची गोडी यांचा पुढाकार …
दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
गडचिरोली—दि.१५ जुलै
गडचिरोली नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई प्रमोद पिपरे यांची सामाजिक सेवा या श्रेणीमध्ये तैलिक गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
संताजी सांकृतिक भवन,सोमवारी क्वार्टर, बुधवार बाजार,सक्करदरा, नागपुर येथे दि.१२जुलै रोजी, युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने तैलिक समाजबांधवांचा महामेळावा व तैलिक गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक म.प्रां.तै.प्रदेशाध्यक्ष मा.खासदार रामदासजी तडस,मुख्य अतिथी आसा ग्रुप ऑप कंपनीज चे अध्यक्ष डॉ. प्रशांतजी झाडे,प्रमुख अतिथी विधानपरिषद आमदार अभिजित वंजारी,पुर्व नागपूर आमदार मा. कृष्णाजी खोपडे,माजी खासदार मा.सुरेश वाघमारे जवाहर विध्यार्थी गृह, रवी.नगर अध्यक्ष रमेशजी गिरडे,तेली समाज सभा नागपूर जिल्हा,अध्यक्ष बाबुराव वंजारी,रा.तै.शा. महासभा राष्ट्रीय अध्यक्ष उमेश शाहु,म.प्रां.तै. महासभा सहसचिव बळवंत मोरघडे,नागपुर विभाग म.प्रां.तै.म.अध्यक्ष जगदीश वैद्य,म.प्रां.तै. महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोदजी पिपरे, उपाध्यक्ष अनिल आष्ट्नकर,युवा फाउंडेशन संस्थापक प्रा.कुणाल पडोळे यांच्या हस्ते माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांचा समाजातील कर्तबगार महिला म्हणुन प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष सत्कारमूर्ती म्हणुन अभिनेता मा.दत्तात्रय उबाळे तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा व दहावी-बारावीतील गुणवंत विध्यार्थी तसेच यूपीएससी, एमपीएससी मध्ये प्रावीन्यप्राप्त अधिकाऱ्यांचा तैलिक गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे या ५ वर्षे नगराध्यक्ष पदावर कार्यरत असतांना तसेच आताही एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणुन तेली समाजातील व ईतर समाजातील महिलांना जागृत करण्यासाठी समाज संघटन,विजया महिला नागरी पतसंस्थाच्या संचालिका,अनेक महिला बचत गटाच्या अध्यक्ष असुन बचत गटाच्या माध्यमातून महिलांची सांस्कृतिक,सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्याकरिता महिलांचे सक्षमीकरण करून अनेक गोर-गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे.तसेच कोरोना काळात बचत गटाच्या माध्यमातून गोर-गरीब,दलित व झोपडपट्टी भागात मोफत अन्यधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,सरकारी दवाखान्यात तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना मोफत भोजन व्यवस्था व त्यांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी वाहनांची मोफत व्यवस्था तसेच नगराध्यक्ष असतांना विकासकामे करून सामाजिक कार्य करण्यात आले.राजकारणापेक्षा समाज कारणाकडे जास्त भर देण्यात आला व इतरही सामाजिक कार्य केले व करीत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्यांचा आज तैलिक गौरव पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी नवयुवक मंडळ संस्थापक सुभाष घाटे,युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष अतुल वांदिले,सं. ब्रि.ते.स.म.संस्थापक अजय धोपटे, ना.वि.महिला आघाडी अध्यक्ष नयना झाडे,युवा फाउंडेशन व आसा ग्रुप ऑफ कंपनीज चे सर्व सदस्य व तेली समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.