ऋषी सहारे
संपादक
महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय आताच्या सरकारने बदलले आहेत. त्यात आता जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
तुम्हाला माहिती असेल – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आघाडी सरकारने हा निर्णय फिरवला होता.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रतिलिटर दर कमी करण्याचा निर्णय.
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबविण्यात येणार – तसेच केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबवणार,
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दि. 31 जुलै, 2020 रोजी बंद केलेली) योजना पुन्हा सुरु.
सरपंच, नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होणार – तसेच आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवला.
सर्वात महत्वाचे म्हणजे आता बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार असेल – मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाच असेल.