ऋषी सहारे
संपादक
गेल्या 3 महिन्यापासून गडचिरोली ते आरमोरी महामार्गावरील आरमोरी लगत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरेड्डीवार यांचे घरासमोर मोठे गड्डे पडले असून त्या गड्यामुळे गेल्या 3 महिन्यात हजारो अपघात झाले आहेत, कित्तेक लोकांची वाहने शतीग्रस्त तर कित्तेक लोकांनी आपला जीव गमवला आहे. या संदर्भात आरमोरी येथील युवकांनी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सूचना देऊनही या कडे संबंधीत विभाग झोपेचे सोंग घेऊन कानाडोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत, या सर्व बाबीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आरमोरी येथील निषेध म्हणून महामार्गावरील गड्यामध्ये बेशरम झाडाचे रोपण करून निषेध नोंदविला आहे.
यावेळी तुषार खेडकर, लकी सोनेकर, मनोज सोरते, अक्षय गेडाम, वसीम शेख , धरम कुमरे, रोहित दहिकार उपस्थित होते.