चिमूर:-
येत्या 16 ऑगस्टला क्रांती भूमी चिमूर मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद झालेल्या शहीद वीरांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे क्रांती भूमीला येणार आहेत,फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार असून आमदार बंटीभाऊ बांगडिया यांचे कार्यक्रमाकडे लक्ष असणार आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते.त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जनता सहकार्य करत असते.परंतु हा कार्यक्रम यशस्वी करताना आमदार साहेब यांनी इतर गोष्टीकडे सुद्धा लक्षित केंद्र करावे असी कोटगाव वासियांची आर्त हाक आहे.
कर्तव्यदक्ष असलेल्या आमदार यांच्यामार्फत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथील पूलाची समस्या कधी सोडविणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे…आणि येत्या 16 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर काय बोलतात याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
कोटगाव या गावाला चौबाजूने नदीने वेडा दिला असून छोट्याशा पाण्याने संपूर्ण नदीला पूर येत असून गावकऱ्यांच्या दळणवळणाचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो.
शाळेकरी मुलांचं काय…?
पावसाळ्यामध्ये नाल्याला पूर येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात शाळा जाते. Covid-19 च्या काळामध्ये दोन वर्षांमध्ये विद्यार्थी शाळेत गेले नाही.आत्ता नियमीत शाळा चालू झाल्यात.परंतु पावसामुळे विद्यार्थ्यांची शाळा जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.
गरोदर स्त्रियांचे काय….?
नाल्याला फार मोठ्या प्रमाणात पूर येत असल्याने ऐन पावसाळ्यात गावातील गरोदर महिला गावा मध्ये राहत नाही, त्याचबरोबर गरोदर असणाऱ्या स्त्रिया कोटगाव (माहेर) ला येत नाही.
विजेचा तुटवडा….
गाव मध्ये फार मोठ्या प्रमाणात विजेचा पुरवठा खंडित होत असून याकडे महावितरणाने लक्ष दिले पाहिजे… सुल्लकशा कारणावरून गावातील वीज जात असून रात्रभर येत नाही त्यामुळे गावातील छोटे मुलं सैरावैरा होत असून त्यांना झोप येत नाही.
या बातमीच्या माध्यमातून मायबाप सरकारला एवढेच सांगणं आहे की कोटगाव नदीवरील पूल लवकरात बांधण्यात यावे.नाहीतर 16 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्य उपक्षम रामटेके एक दिवसीय आंदोलन करणार आणि प्रशासनाचे लक्ष वेधणार..?