युवराज डोंगरे/खल्लार

 खल्लार नजिकच्या गौरखेडा येथे मिलिंद विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाचा कार्यक्रम 14 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण मधुकरराव अभ्यंकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक केतन खिरकर हंतोडा प्राध्यापक उद्धव कोकाटे अध्यक्ष गाडगे बाबा पतसंस्था परतवाडा, विवेक अभ्यंकर ,सुधाकर राव धुरंधर ,राजू हरणे ,भास्कर चव्हाण उपस्थित होते .

विद्यार्थ्याचा गणवेश हा विद्यालयाची ओळख आणि त्याची शिस्त दर्शवीत असतो. तर समाजामध्ये एक शिस्तप्रिय नागरिक घडवण्या मागे गणवेशाची भूमिका फार महत्त्वाची आहे असे विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून मधुकरराव अभ्यंकर यांनी व्यक्त केले .

यावेळी प्रमुख पाहुणे श्री केतन किरकर यांनी आपले विचार व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव भांडे यांनी केले सूत्रसंचालन अमित वानखडे व आभार प्रदर्शन प्रशांत वानखडे यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी अमित वानखडे ,दिपक रहाटे ,दिपक कावरे , मनीषा गावंडे ,अमोल बोबडे संजय आठवले ,आनंद खंडारे, गणेश अंभोरे ,प्रशांत वानखडे यांनी अथक परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com